Ukraine attack on Russia News : रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. उभय देशांमध्ये युद्धबंदीसाठी चर्चा सुरू आहे. पण यात अद्यार यश आलेले नाही. याचदरम्यान युक्रेननं रशियावर जोरदार ड्रोन हल्ला केला आहे. ज्यामुळे तब्बल कोटी डॉलरचे नुकसान झाले असून या ड्रोन हल्ल्या 4 एअर बेसला लक्ष करण्यात आले असून 40 विमानं ध्वस्त करण्यात आली आहेत. यामुळे आता रशिया-युक्रेन युद्धाला नवे वळण लागले आहे.
गेल्या ती वर्षांपासून सुरू असणाऱ्या रशिया-युक्रेन युद्धाला आज (ता.1) युक्रेनने रशियामध्ये केलेल्या ड्रोन हल्लामुळे वेगळे वळण मिळाले आहे. युक्रेनने रशियामध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनने रशियातील सायबेरियातील एअरबेसवर ड्रोन हल्ला करत 40 हून अधिक रशियन विमानांना लक्ष्य केलं आहे. तसेच याबाबचे आता काही फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात रशियन लष्करी तळावर तैनात झालेल्या ड्रोन हल्ला झाल्याचे समोर येत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धावपट्टीवर उभी असलेली विमाने ज्वाला आणि धूराच्या लोटात असलेली दिसत आहेत. तर या धुरातून एक ड्रोन उडताना दिसत असून नंतर थोडे पुढे भयानक आग आणि धूर दिसत आहे.
या हल्ल्यानंतर युक्रेनने आपली अधिकृत प्रतिक्रियाही दिली असून लष्कराने रशियातील काही हवाई तळांना लक्ष केल्याची माहिती दिली आहे. या हल्ल्यांत 40 पेक्षा जास्त बॉम्बर्संचा वापर करत बॉम्बर विमानांना लक्ष करण्यात आले. मरमंस्कमधील ओलेन्या, इरकुत्स्कमधील बेलाया (एयर बेस), इवानोवो येथील इवानोवो हवाई तळ तसेच डायगिलेवो अशा एकूण चार हवाई तळांवर हल्ला करण्यात आला आहे. ज्यात रशियामधील 4 मोक्याच्या विमानतळांवर ड्रोन हल्ला झाल्याचेही सांगितले आहे.
युक्रेनच्या माहितीनुसार, युक्रेनने रशियामध्ये पावुत्यना म्हणजेच ऑपरेशन स्पायडरवेब नावाची एक विशेष ऑपरेशन राबवले. ज्यात रशियाच्या लांब पल्ल्याच्या हल्ल्याच्या क्षमतेवर मात करत युक्रेनने हा हल्ला केला.
युक्रेनचे ऑपरेशन स्पायडरवेब
युक्रेनने रशियात केलेल्या ड्रोन हल्ल्यात (ऑपरेशन स्पायडरवेब) रशियाचे TU-95 आणि TU-22M3 बॉम्बर्स विमानांसह एक A-50 हवाई पूर्वसूचना विमान उद्धवस्त करण्यात आले आहे. या हल्ल्यात तब्बल 200 कोटी डॉलर्सचे नुकसान झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.