joe biden
joe biden sarkarnama
देश

बायडन यांच्याकडून रशियाला धक्क्यावर धक्के; युक्रेनच्या लढाऊ बाण्याचही केलं कौतुक

सरकारनामा ब्युरो

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी आज आपल्या पहिल्या स्टेट ऑफ युनियन भाषणात युक्रेनच्या लढाऊ बाण्याचे तोंड भरुन कौतूक केले. शिवाय युक्रेनबद्दल सहानुभूती व्यक्त करत अमेरिकेकडून तब्बल १ बिलियन डॉलर्सची मदत जाहीर केली. तसेच याच भाषणात बायडन यांनी रशियाला जोरदार धक्के दिले. युक्रेनवर केलेल्या आक्रमणाची किंमत मोजीवी लागेल असा इशारा देत अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लागू केले आहेत.

आजच्या भाषणात बोलताना जो बायडन यांनी रशियासाठी (Russia) अमेरिकन एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय जाहिर केला आहे. कॅनडा आणि इतर युरोपीय देशांनी यापूर्वीच रशियासाठी एअरस्पेस बंद केली आहे. यावेळी बोलताना जो बायडन यांनी नाटो सदस्यांच्या संरक्षणासाठी सज्ज राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे, मात्र अमेरिका युक्रेनमध्ये लष्कर घुसवणार नाही हे देखील आज बोलताना स्पष्ट केले आहे. तसेच यापुढे टप्प्याटप्याने रशियावर आर्थिक निर्बंध वाढवणार असल्याचे त्यांनी जाहिर केले आहे.

या भाषणापूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलनस्की (Volodymyr Zelensky) यांनी बायडन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी बायडन यांनी तिथल्या परिस्थितीची माहिती घेतली तर झेलनस्की यांनी युक्रेनमधील रशियाचे आक्रमण लवकरात लवकर थांबवणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे. तर युरोपीयन युनियनने रशियाच्या दबावानंतरही आपल्याला सदस्य म्हणून घ्यावे आणि ते युक्रेनसोबत कायम असल्याचे दाखवून द्यावे असे वक्तव्य केले. अमेरिकेशिवाय जागतिक बँकेनेही युक्रेनला तात्काळ तब्बल ३ बिलीयन डॉलरची मदत जाहिर केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT