Union Budget and Ministries Sarkarnama
देश

Union Budget 2024 : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पात कोणत्या मंत्रालयास किती तरतूद?

Union Budget and Ministries News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

Mayur Ratnaparkhe

Modi Sarkar 3.0 Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प-2024 सादर केला आहे. हा अर्थसंकल्प 48 लाख 20 हजार कोटी रुपयांचा आहे. या अर्थसंकल्पात प्रत्येक मंत्रालयासाठी वेगवेगळा निधी दिला गेला आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठी सर्वात जास्त निधीची तरतूद केली गेली आहे. केंद्र सरकारने राजानाथ सिंह यांच्या संरक्षण मंत्रालयास 4 लाख 54 हजार 773 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

ग्रामविकास मंत्रालयासाठी बजेटमध्ये 2 लाख 65 हजार 808 कोटींची तरतूद आहे. शिवराज सिंह चौहान हे सध्या देशाचे ग्रामविकास मंत्री आहेत. जर कृषी क्षेत्राबाबात बोलायचं झालं तर 1 लाख 51 हजार 151 कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. या मंत्रालयाची जबाबदारीही शिवराज सिंह चौहान(Shivraj Singh Chauhan) यांच्याकडेच आहे.

याशिवाय अमित शाह(Amit Shah) यांच्या गृहमंत्रालयासाठी 1 लाख 50 हजार 983 कोटींची तरतूद केली गेली आहे. तर या बजेटमध्ये शिक्षण मंत्रालयास 1 लाख 25 हजार 638 कोटी रुपये दिले गेले आहेत. तसेच दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयास 1 कोटी 16 लाख 342 रुपयांची तरतूद केली गेली आहे.

आरोग्य मंत्रालयास यंदाच्या बजेटमधून में 89 हजार 287 कोटी रुपये मिळाले आहेत. ऊर्जा मंत्रालयाच्या वाट्याला 68 हजार 769 कोटी रुपयांची तरतूद आहे. सामाजिक कल्याण मंत्रालयास 56 हजार 501 कोटी रुपये दिले गेले आहेत. कॉमर्स आणि उद्योग मंत्रालयासाठई 47 हजार 559 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यंदा देशाचं एकूण बजेट 48 लाख 20 हजार 512 कोटी रुपये आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT