Share Market : आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असून अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून देशाचा अर्थसंकल्प मांडला जात आहे. परंतु आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे वृत्त आहे. आज बाजारात झालेल्या प्रचंड विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाच्या काही क्षणांपूर्वीच ही मोठी पडझड झाल्याचे दिसून आले आहे. आज 2026 चा अर्थसंकल्प सादर केला जात असून त्यापूर्वीच मुंबईतील शेअर बाजाराला हा धक्का बसला आहे. सेन्सेक्स जवळपास 80 ते 100 अंकांनी तर निफ्टी 50 हून अधिक अंकांनी खाली आला असून सध्या स्थिरावला आहे.
सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये घसरण झाली. यामुळे अवघ्या काही तासांत गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये बुडाल्याचे वृत्त आहे. बँकिंग, आयटी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक पडझड झाल्याची माहिती आहे. दरम्यान अर्थसंकल्पीय घोषणांचा बाजारावर थेट परिणाम होत असतो. अर्थसंकल्पाच्या अपेक्षित घोषणा आणि त्यावरील गुंतवणूकदारांच्या प्रतिक्रिया या पार्श्वभूमीवर ही सुरुवातीची पडझड लक्षणीय आहे. गुंतवणूकदारांमध्ये सध्या वेट अॅण्ड वॉच अशी परिस्थितीती आहे.
मध्यमवर्गीय आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी पोर्टफोलिओ हा लाल रंगात गेल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, बाजारातील ही घसरण तात्पुरती असू शकते. अर्थसंकल्पातील घोषणांनंतर बाजार पुन्हा उसळी घेण्याची शक्यता आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाईने निर्णय न घेता संयम पाळावा, असे काही तज्ज्ञांनी सांगितले.
नेमका का कोसळलं शेअर मार्केट?
गुंतवणूकदारांमध्ये ‘कॅपिटल गेन्स टॅक्स’ (Capital Gains Tax) वाढण्याची भीती होती. नव्या कररचनेमुळे नफ्यावर परिणाम होईल या चिंतेतून मोठ्या प्रमाणावर नफा वसुली (Profit Booking) करण्यात आली. अमेरिकन आणि आशियाई शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात न केल्याने जागतिक बाजारात सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले. मध्य-पूर्वेतील तणावामुळे ब्रेंट क्रूड ऑइलचे दर प्रति बॅरल 70 डॉलरच्या पुढे गेले आहेत. भारत हा मोठा तेल आयातदार देश असल्याने याचा थेट फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला. त्याचबरोबर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात भांडवल काढून घेतले असून, याचाही परिणाम दिसून येत आहे. याशिवाय सातत्याने रुपयाची घसरण होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.