Nirmala Sitharaman  sarkarnama
देश

Nirmala Sitharaman : अमेठीच्या करेट कार्यक्रमानंतर आता भाजपचे टार्गेट बारामती

Nirmala Sitharaman : भाजपची नजर बारामतीवर असल्याने 'बी फॉर बारामती' ही मोहिम हाती घेतली आहे.

सरकारनामा ब्युरो

-संतोष आटोळे

इंदापूर : बारामती (baramati)लोकसभा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात अनेक बडे नेते बारामतीत येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या ता येत्या 22,23 व 24 तारखेला तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 6 तारखेला बारामती लोकसभा मतदारसंघात येत आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या ताब्यात येईल, यासाठी पक्षश्रेष्ठींनी केंद्रीय पातळीवरील बडे नेते बारामतीत येणार असल्याचे नियोजन केले आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत बारामतीतून भाजपचाच खासदार निवडून येईल, यासाठी दिल्लीवरून नियोजन सुरु आहे.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपने ए फॉर अमेठी ही मोहीम फत्ते करुन अमेठी ताब्यात घेतली. आता भाजपची नजर बारामतीवर असल्याने 'बी फॉर बारामती' ही मोहिम भाजपने हाती घेतली आहे," असे बारामती लोकसभा मतदारसंघ भाजप प्रभारी राम शिंदे यांनी सांगितले.

इंदापूर येथील अर्बन बँकेच्या सभागृहात सीतारामन,बावनकुळे यांचा दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर आयोजित भाजप संवाद बैठकीत राम शिंदे बोलत होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, किसन मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पृथ्वीराज जाचक, अविनाश मोटे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, मारुती वणवे, तेजस देवकाते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

राम शिंदे म्हणाले, "2019 ला कोणालाही वाटेल नव्हते अमेठीतील गांधी पराभूत होतील पण भाजपने ते करून दाखवले,आता 2024 ला बी फॉर बारामतीचे मिशन हाती घेतले आहे. यासाठीच अर्थमंत्री बारामती लोकसभा मतदारसंघ दौऱ्यावर येत आहेत,"

हर्षवर्धन पाटील म्हणाले, "बारामती लोकसभा मतदारसंघ दौऱ्यावर येणाऱ्या निर्मला सीतारामन याचे इंदापूर मध्ये भव्य स्वागत केले जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून केंद्रीय पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. आता केंद्रात आणि राज्यात आपले सरकार असल्याने कोणत्याही विकास कामाना अडचण येणार नाही,"

यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यांच्या नियोजनाची माहिती दिली. यावेळी विलास वाघमोडे, शहरध्यक्ष शकील सय्यद, ॲड. कृष्णाजी यादव, अशोक इजगुडे, गोरख शिंदे, शेखर पाटील,सुनील अरगडे, हरिभाऊ जाधव, बाळासाहेब मोरे, माऊली चवरे, पिंटू काळे, माऊली वाघमोडे, गजानन वाकसे उपस्थित होते.यावेळी तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी प्रास्ताविक केले. तानाजी थोरात यांनी आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT