Narendra Modi and Nirmala Sitharaman  Sarkarnama
देश

Narendra Modi News : पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पाबद्दल निर्मला सीतारामन यांचे केले कौतुक; म्हणाले...

Nirmala Sitharaman : निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला

सरकारनामा ब्यूरो

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज (दि.१ फेब्रुवारी) संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केला आहे. मंत्री सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, ''या अर्थसंकल्पामध्ये विविध क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून सर्वत क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. तसेच या अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण भाग आणि शहरात असणाऱ्या अर्थव्यवस्थेतील दरी कमी होईल. शेतकऱ्यांना समृद्ध करणारा असा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांचे जीवन बदलणार आहे'', असं मोदी यावेळी म्हणाले.

''सध्या भारत प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. तसेच या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच शिक्षण क्षेत्राला देखील मोठे पॅकेज देण्यात आले आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊल पडत आहे. शेतकऱ्यांना सक्षम बनवणारा हा अर्थसंकल्प आहे. हे बजेट गरिबांचे स्वप्न पूर्ण करणारे आहे'', असंही ते यावेळी म्हणाले.

''प्रत्येक क्षेत्रात आपण अधुनिकतेची कास धरायला हवी. अर्थसंकल्प अल्पभूधारक शेतकऱ्यांना सक्षम करणार आहे. तसेच मागासवर्गीयांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असून महिलांसाठी महत्वाच्या योजना राबवण्यात येणार आहे'', असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT