Ashwini Choubey
Ashwini Choubey Sarkarnama
देश

Ashwini Choubey : 'ती' गोष्ट समजताच केंद्रीय मंत्र्यांचा आश्रूचा बांध फुटला अन्‌ ते पत्रकार परिषदेतच ढसाढसा रडले

सरकारनामा ब्यूरो

पाटणा : केंद्रीय मंत्री (UnionMinister) अश्विनी चौबे (Ashwini Choubey) सोमवारी (ता. १६ जानेवारी) पाटणा येथील भाजप (BJP) कार्यालयात पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले (CRY). जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी उपोषणाला बसलेल्या एका भाजप नेत्याचा मृत्यू झाला, त्याबद्दलची माहिती मिळताच चौबे यांना दुःख अनावर झाले आणि ते पत्रकार परिषदेत सर्वांसमोरच रडू लागले, त्यामुळे व्यासपीठावर बसलेले नेते आणि पत्रकारांनाही काय करावे, हे सूचत नव्हते. (Union Minister Ashwini Choubey crie at the press conference)

जमिनीची योग्य किंमत आणि मोबदला मिळावा, या मागणीसाठी परशुराम चतुर्वेदी नावाचे भाजपचे नेते आंदोलन करत होते. चतुर्वेदी हे गेल्या ८६ दिवसांपासून बक्सरमध्ये उपोषण आंदोलन करत होते. मात्र, उपोषणादरम्यान त्यांचे ह्‌दयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवाने निधन झाले. भाजप नेते परशुराम चतुर्वेदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना अश्विनी चौबे म्हणाले की, चतुर्वेदी यांनी शेतकऱ्यांसाठी त्याग केला आहे. त्यांच्या निधनामुळे मी आधीच दु:खी होतो. या घटनेने मला इतके दुःख झाले की मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही.

रम्यान, परशुराम चतुर्वेदी हे केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांच्यासोबत कायम असायचे. चतुर्वेदी यांच्या निधनाचे वृत्त समजताच चौबे यांना धक्का बसला. ते दुःख पत्रकार परिषदेतही लपवू शकले नाहीत आणि त्यांच्या आश्रूचा बांध फुटला. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांनाही काय करावे, हे सूचत नव्हते.

दरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट वाहनाला रविवारी संध्याकाळी अपघात झाला. त्यात पाच पोलिस जखमी झाले आहे. चौबे हे बक्सरहून पाटण्याला जात असताना हा अपघात झाला. त्यांच्या ताफ्यातील कार उलटून खड्ड्यात जाऊन पडली. त्या कारच्या मागेच केंद्रीय मंत्र्यांची गाडी होती. त्यामुळे चौबे हे थोडक्यात बचावले. केंद्रीय मंत्री म्हणाले की, दोन पोलिसांना गंभीर दुखापत झाली आहे, त्यांना पुढील उपचारांसाठी पाटणाच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT