Nitin Gadkari, Jyotiraditya Scindia
Sarkarnama
नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) सोडून भाजप (BJP) मध्ये दाखल झाल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली. त्यानंतर त्यांनी मध्य प्रदेशसह इतर राज्यांमध्येही नवीन विमानसेवा, विमानतळ उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनीही सेंट्रल रोड अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड या योजनेतून शिंदे यांच्या ग्वाल्हेर-चंबळ क्षेत्रासाठी सुमारे 500 कोटी रुपये दिले आहे.
गडकरी यांनी दिलेल्या या निधीनंतर भारावून गेलेल्या शिंदे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी गडकरींची जाहीर माफीही मागितली आहे. शिंदे यांनी नुकतेच ट्विट करून माफी मागत असल्याचे म्हटले आहे. शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मध्य प्रदेशासाठी मोठा निधी मिळाला आहे. योजनेतून 23 रस्त्यांच्या कामांसाठी 1814 कोटी रुपये देण्यात मान्यता मिळाली आहे. त्यासाठी नितीन गडकरी यांचे मनापासून आभार मानतो.
केंद्र-राज्याच्या डबल इंजिनच्या सरकारमुळे बुलेटच्या वेगाने राज्याचा विकास सुरू आहे. या दिशेने 600 किमी लांब रस्ते तयार करणे हे मोठे पाऊल आहे. मी सतत पाठपुरावा केल्यानंतर ग्वाल्हेर-चंबल क्षेत्रासाठी 500 कोटी रुपयांचा निधी चार महत्वाच्या रस्ते योजनांसाठी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे.
विविध योजनांची माहिती देत शिंदे यांनी दोन वेळा गडकरींचे आभार मानले आहेत. या ट्विटच्या मालिकेत शेवटी त्यांनी माझ्याकडून झालेल्या कोणत्याही त्रासाबद्दल माफी मागतो. या योजनांच्या मंजूरीसाठी तुमचा ऋणी राहिन, असे शिंदे यांनी म्हटले आहे. पण माफी कशाबद्दल मागितली, यावरून आता चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.