Nitin Gadkari Sarkarnama
देश

Nitin Gadkari : आमची चौथ्यांदा येण्याची गॅरंटी नाही, पण..! नितीन गडकरी असं का म्हणाले?

NDA Government Ramdas Athawale Election : नागपुरात रामदास आठवले यांच्या सत्कारप्रसंगी बोलताना नितीन गडकरी यांनी हे भाष्य केले आहे.

Rajanand More

Nagpur : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या एका विधानावरून चर्चांना तोंड फुटले आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात मिश्कील टिपण्णी करताना त्यांनी आम्हाला चौथ्यांदा येण्याची गॅरंटी नसल्याचे म्हटले आहे. त्यांचे हे विधान चर्चेत आले आहे.

नागपुरात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना गडकरींच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना गडकरी यांनी हे विधान केले आहे. गडकरी यांच्याआधी आठवलेंचे भाषण झाले होते. या भाषणादरम्यान आठवलेंनी देशात चौथ्यांदाही मोदी सरकार येण्यार असल्याचे म्हटले होते. त्याचाच संदर्भ गडकरींन दिला.

गडकरी म्हणाले, रामदास आठवलेंनी आत्ताच सांगितले की चौथ्यांदाही आम्हीच येणार आहोत. आमची गॅरंटी नाही, पण त्यांची गॅरंटी पक्की आहे. मी गंमतीने म्हणतोय. राज्य कुणाचंही आले तरी रामदासजी पक्के आहेत. त्यांनीच हे एका भाषणात सांगितले होते. ते हवामान शास्त्रज्ञ आहेत. लालूप्रसाद यादव यांनी रामविलास पासवान यांच्याविषयी एकदा सांगितले होते की, हे एक राजकीय हवामान शास्त्रज्ञ आहेत. काय होणार हे त्यांना माहिती असते, त्यानुसार ते निर्णय़ घेतात.

आठवलेंचे कौतुक

नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणादरम्यान आठवलेंचे कौतुक केले. ते म्हणाले, सुरूवातीच्या काळात दलित पॅंथरच्या माध्यमातून एक तरुण नेता म्हणून रामदास आठवलेंनी सामाजिक संघर्षाचे काम केले. त्यानंतर ते रिपब्लिकन पक्षाला शक्तीशाली बनवण्यासाठी यशस्वी नेतृत्वही दिले. रामदास आठवले यांनी आपल्या आयुष्यात दलित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.

आमच्या पक्षासोबत आघाडी झाल्यानंतर ते सामाजिक न्याय विभागाचे मंत्री झाले. या काळात लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे घर, दिल्लीतील आंबेडकरांचे वास्तव्य असलेल्या घराचे स्मारक निर्माण झाले. मुंबईत इंदू मिलच्या ठिकाणी मोठे स्मारक होत आहे. अनेक अडकलेल्या गोष्टींचा पाठपुरावा त्यांनी केला. दलित चळवळीचे रुपांतर आर्थिक विकासाच्या चळवळीत व्हावे, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य खूप मोठे आहे, असे गडकरींनी सांगितले.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT