Ramdas Athawale
Ramdas Athawale  Sarkarnama
देश

Nagaland Election Result : रामदास आठवलेंचा नागालँडमध्येही डंका; दोन उमेदवार विजयी

सरकारनामा ब्यूरो

Assembly Election Result : ईशान्य भारतातील तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (२७ फेब्रुवारी) मतदान झाले होते. तर, त्रिपुरा राज्यात १६ फेब्रुवारीला मतदान संपन्न झाले होते.

आज तिन्ही राज्यांची मतमोजणी प्रक्रिया पार परडत आहे. या निवडणुकीत नागालँडमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाच्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) ने येथे पहिल्यांदाच बाजी मारली आहे. त्यामुळे नागालँडमध्ये रामदास आठवले यांचा डंका दिसून आला आहे.

आज नागालँडमध्ये विधानसभेच्या ६० जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत काही निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजप-एनडीपीपी युतीला आघाडी मिळताना दिसत आहे.

दरम्यान, मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. थोड्याच वेळात सर्व निकाल समोर येतील. त्यानंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, आणि बहुमत कुणाला मिळाले हे स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT