Ramdas athawale
Ramdas athawale  Sarkarnama
देश

Ramdas Athawale News :..अन् रामदास आठवलेंच्या शायरीने राज्यसभेत पिकला हशा; नेमकी काय घडलं?

सरकारनामा ब्यूरो

Politics :अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. या पार्श्वभूमीवरच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी सभागृहात शेरोशायरी केली आणि एकच हशा पिकला. त्यामुळे त्यांच्या शेरोशायरीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

यावेळी रामदास आठवले यांनी काँग्रेसवर टीका केली. आठवले म्हणाले की, 'राष्ट्रपती जी का भाषण मजबूत करेगा भारत नेशन, विरोध करना है काँग्रेस का फैशन.. इसलिए मैं उनके विरोध में कर रहा हूं भाषण', असं म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला.

आठवले पुढे म्हणाले, ''मोदी जी को मालूम है देश के तमाम लोगों की नाडी, तो काँग्रेस की कैसे चलेगी उनके सामने गाडी... मोदी जी आदमी है खास, इसलिए उनके साथ है रामदास.. मोदी जी को विकास की है आस इसलिए राजनीति में ओ हो गऐ हैं पास..'', असं म्हणत त्यांनी सभागृहात शेरोशायरी केली.

तसेच काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, ''काँग्रेसवालो जितनी बढानी है बढाओ दाढी, लेकिन मोदी जी की बहुत मजबूत है बॉडी'', अशी शायरी त्यांनी केली. यावर सभागृहात एकच हशा पिकला.

दरम्यान, आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सातवा दिवस होता. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी उत्तर दिलं. तसेच मोदींनी आज सभागृहात भाषण करताना विरोधकांवर जोरदार प्रहार केला.

यावेळी त्यांनी देशातील विविध मुद्यांवर भाष्य केलं. त्याच बरोबर २०१४ च्या आधी देशातील परिस्थिती काय होती? तर २०१४ नंतर केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर काय फरक पडला? याबाबत सांगत काँग्रेसवर टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT