Union Minister Nitin Gadkari Latest Marathi News Sarkarnama
देश

वाऱ्यामुळे पडला पूल; 'आयएएस' अधिकाऱ्यानं गडकरींना दिला धक्का

देशात पूल कोसळल्याच्या किंवा काम सुरू असलेल्या पुलाचा काही भाग कोसळल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशात पूल कोसळल्याच्या किंवा काम सुरू असलेल्या पुलाचा काही भाग कोसळल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पण एका पुलाचा भाग वाऱ्यामुळे कोसळल्याचा दावा एका सचिव दर्जाच्या 'आयएएस' (IAS) अधिकाऱ्याने केल्याचे समोर आले आहे. या अधिकाऱ्याच्या दाव्यानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही धक्का बसला आहे. याबाबत गडकरींनीच एका कार्यक्रमात आश्चर्य व्यक्त केलं आहे. (Union Minister Nitin Gadkari Latest Marathi News)

बिहारमधील सुलतानगंजमध्ये एका निर्माणाधीन पुलाचा काही भाग 29 एप्रिल रोजी कोसळला आहे. गंगा नदीवर या पुलाचे काम सुरू आहे. वादळी वाऱ्यादरम्यान पूल कोसळला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण पूल कोणत्या कारणामुळे पडला हे सांगताना संबंधित आयएएस अधिकाऱ्याने वादळी वाऱयाला दोष दिला.

गडकरी यांनी या दाव्यावर सोमवारी आश्चर्य व्यक्त केलं. एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, 'बिहारमध्ये 29 एप्रिल रोजी एक पूल कोसळला. सचिवांना याचं कारण विचारले तर त्यांनी जोराच्या वाऱ्यामुळे हे घडल्याचे सांगितले.' यावर आश्चर्य व्यक्त करत गडकरी त्यांनी आयएएस अधिकाऱ्याच्या या स्पष्टीकरणावर विश्वास कसा ठेवता येईल, असा सवाल उपस्थित केला.

मला समजत नाही की हवेमुळे पुल कसा पडू शकतो? नक्कीच काहीतरी चूक झाली असणार, ज्यामुळे पूल पडला, असंही गडकरी म्हणाले. दरम्यान, कार्यक्रमादरम्यान गडकरी यांनी गुणवत्तेशी तडजोड न करता पुलांसाठीचा खर्च कमी करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे सांगितले. बिहारमधील सुलतानगंज येथून अगुवानी घाटदरम्यान 2014 मध्ये पुलाचे काम सुरू झाले आहे. हे काम 2019 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. पण अजूनही हे काम अर्धवट आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT