Sidharth Nath Singh sarkarnama
देश

धक्कादायक : उमेदवारी अर्ज भरताना योगींच्या मंत्र्यावर जीवघेणा हल्ला

सिद्धार्थ नाथ सिंह हे प्रयागराज पश्चिम येथून निवडणूक लढविणार आहेत. या मतदार संघातून ते दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशाचे कॅबिनेट मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह (Sidharth Nath Singh) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. ही घटना गुरुवारी मुंडेरा ट्रान्सपोर्ट नगर जवळील भाजप कार्यालय परिसरात घडली.

उत्तरप्रदेश भाजपचे नेते, कॅबिनेट मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह हे उमेदवारी अर्ज भरत असताना हा हल्ला झाला. हल्लेखोर व्यक्तीला कार्यक्रते, आणि सुरक्षारक्षकांनी पकडले आहे. हल्लेखोर व्यक्तीजवळ विष आणि ब्लेड होते, असे उपस्थितांनी सांगितलं.Sidharth Nath Singh News

सिद्धार्थ नाथ सिंह हे प्रयागराज पश्चिम येथून निवडणूक लढविणार आहेत. या मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. याठिकाणी पाचव्या टप्यात २७ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. २०१७ मध्ये सिद्धार्थ नाथ सिंह यांनी समाजवादी पार्टीच्या ऋचा सिंह यांचा पराभव केला होता. सिद्धार्थ नाथ सिंह हे सध्या योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असून प्रवक्ताही आहेत.

सिद्धार्थ नाथ सिंह माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातेवाईक आहेत. कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री असा त्याचा राजकीय प्रवास आहे.आज उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मैार्य, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपचे अनेक उमेदवार अर्ज भरणार आहेत.

लखनऊच्या सरोजनी नगर विधानसभा मतदारसंघातून राजराजेश्वर सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्य मंत्री स्वाती सिंह यांना डावलून राजराजेश्वर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. यामुळे आता स्वाती सिंह यांचे पती मात्र आनंदी झाले आहेत. सरोजनी नगर मतदारसंघातून दयाशंकर सिंह आणि त्यांची पत्नी स्वाती सिंह हे दोघेही इच्छूक होते. पती-पत्नीच्या भांडणामुळे पक्षासमोरही अडचण निर्माण झाली होती. अखेर दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असा प्रकार घडला. दोघांनाही डावलून राजराजेश्वर यांना सरोजनी नगरमधून भाजपने तिकिट दिलं आहे.उत्तरप्रदेशात विधानसभेच्या ४०३ जागा आहेत. येथे सात टप्यात मतदान होत आहेत. १० मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT