Yogi Adityanath and Keshav Prasad Maurya  Sarkarnama
देश

विधान परिषदेची रणधुमाळी! उपमुख्यमंत्र्यांना भाजपनं उतरवलं मैदानात

राज्यपालनियुक्त आमदारांच्या जागा रिक्त असून, त्याबाबतही लवकरच निर्णय

सरकारनामा ब्युरो

लखनौ : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशात भाजपने 9 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात विद्यमान उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत मौर्य यांचा पराभव होऊनही भाजपने त्यांना उपमुख्यमंत्रिपद दिलं होतं. आता त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेची संधी देण्यात आली आहे. (Legislative Council Election News)

उत्तर प्रदेशात भाजपने (BJP) पुन्हा सत्ता मिळवली पण भाजपची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली होती. कारण उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. मौर्य हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांची विधान परिषदेची मुदत सप्टेंबर महिन्यात मुदत संपत असून, त्यांना उपमुख्यमंत्रिपदावर कायम राहण्यासाठी सहा महिन्यांत आमदार म्हणून निवडून येणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांना पुन्हा विधान परिषदेची संधी देण्यात आली आहे.

भाजपने मौर्य यांच्यासह भूपेंद्रसिंह चौधरी, दयाशंकर मिश्र दयालू, जे.पी.एस.राठोड, नरेंद्र कश्यप, जसवंत सैनी, दानिश आझाद अन्सारी, बनवारीलाल दोहरे आणि मुकेश शर्मा यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. उत्तर प्रदेशात एकूण विधान परिषदेच्या 13 जागांसाठी निवडणूक होत आहे. यातील 9 जागांवर भाजपचा विजय निश्चित आहे. यामुळं भाजपने 9 उमेदवार जाहीर केले आहेत. राज्यपालनियुक्त आमदारांच्या सहा जागा रिक्त असून, त्याबाबत लवकरच निर्णय होणार आहे.

मौर्य यांचा सिराथू मतदारसंघात पराभव झाला होता. पराभूत झालेले होऊनही मौर्य यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद कायम राहिले होते. मौर्य हे ओबीसी नेते आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याकडे पक्ष नेतृत्वाचा कल होता. मौर्य यांचा 6 हजार 841 मतांनी पराभव झाला होता. अपना दल (कामेरावादी) पक्षाच्या पल्लवी पटेल यांनी सराथूमधून विजय मिळवित मौर्य यांना पराभवाची धूळ चारली होती. मौर्य यांच्या पराभवामागे भाजपमधील अंतर्गत राजकारण असल्याची चर्चाही रंगली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT