UP Election 2022 sarkarnama
देश

उत्तरप्रदेशच्या आखाड्यात ११४ आठवी पास, १२ निरक्षर तर ६ पीएचडीधारक!

अमरोहा, , बरेली, बिजनौर, बदायूं, मुरादाबाद, रामपुर, सहारनपुर, संभल आणि शाहजहांपुर येथील ५५ विधानसभा मतदार संघात १४ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहेत.

सरकारनामा ब्युरो

नोएडा (उत्तर प्रदेश ) : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022)पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आहे. राज्याच्या पश्चिम भागाच्या ११ जिल्ह्यांतील ५८ मतदारसंघात मतदान झाले आहे. आता दुसऱ्या टप्यातील मतदानासाठी प्रचाराला वेग आला आहे.

दुसऱ्या टप्यात निवडणूक लढविणाऱ्या ११४ उमेदवार हे आठवी पास आहेत, १०२ उमेदवार हे पदवीधर, तर १२ उमेदवार हे निरक्षर असल्याची माहिती समोर आली आहे. एडीआरच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. पीएचडी प्राप्त सहा उमेदवार आपले नशीब अजमावण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

५५ विधानसभेसाठी सोमवारी मतदान

पश्चिम उत्तर प्रदेशमधील नऊ जिल्हातील अमरोहा, , बरेली, बिजनौर, बदायूं, मुरादाबाद, रामपुर, सहारनपुर, संभल आणि शाहजहांपुर येथील ५५ विधानसभा मतदार संघात १४ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहेत. एडीआरचा हा अहवाल दुसऱ्या टप्यात निवडणूक लढविणाऱ्या ५८६ उमेदवारांपैकी ५८४ उमेदवारांच्या अर्जामधील माहितीच्या आधारे आहे.

यातील दोन उमेदवारांच्या विश्लेषण करण्यात आलेले नाही, कारण त्यांच्या माहिती अपूर्ण आहे, असे एडीआरने म्हटलं आहे. एडीआरच्या अहवालानुसार, ६७ उमेदवार साक्षर, १२ उमेदवार पाचवी पास, ३५ उमेदवार आठवी पास, ५८ उमेदवार १० वी पास, तर ८८ उमेदवार १२ पास आहेत.

या नऊ जिल्ह्यांमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मोरादाबादमध्ये सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतदारांचे प्रमाण हे ५० ते ५५ टक्के आहे. साधारणपणे सरासरी ४० ते ४५ टक्के मुस्लीम मतदार या टप्प्यात आहेत. पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील मतदानात मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानाला बाहेर पडले होते. हा कल लक्षात घेतल्यास दुसऱ्या टप्प्यातही मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतील अशी चिन्हे आहेत. मुस्लीम मतदानाचा टक्का वाढणे हे भाजपसाठी प्रतिकूल तर समाजवादी पक्षाला अनुकूल ठरू शकते.

हिंदू मतांचे ध्रुवीकरण

मुस्लीमबहुल भाग असल्यानेच समाजवादी पक्षाने २०, बसपने २३, काँग्रेसने २० मुस्लीम उमेदवारांना रिंगणात उतरविले आहे. भाजपचा मित्र पक्ष अपना दलाने (सोनेलाल गट) एक मुस्लीम उमेदवाराला रिंगणात उतरविले आहे. याशिवाय एमआयएमही मुस्लीम मतांवर डल्ला मारू शकतो. मुस्लीमबहुल भागात हिंदू मतांचे ध्रुवीकरण होऊन भाजपचा त्याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न दिसतो.

दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतदारांचे प्रमाण अधिक असल्याने समाजवादी पक्षाला या टप्प्यात चांगल्या यशाची अपेक्षा आहे. भाजपनेही जोर लावला आहे. मतांचे ध्रुवीकरण कसे होते व अल्पसंख्याक मतांचे विभाजन किती होते यावर भाजप आणि समाजवादी पक्षाचे भवितव्य अवलंबून असेल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT