BJP
BJP Sarkarnama
देश

"बाळ ठाकरेंपासून - मनमोहनसिंग ते मुलायम सिंहांपर्यंत" : सगळेच आहेत भाजपचे मतदार

सरकारनामा ब्युरो

उत्तर-प्रदेश (आंबेडकर नगर) : बाळ ठाकरे (Bal Thackeray) यांचे स्वप्न मोठं होवून एक नावाजलेला क्रिकेटर होण्याचं आहे. पण जेव्हा ही गोष्ट ते मुलायमसिंह (Mulayam Singh Yadav) आणि ज्ञानी झैलसिंह यांना सांगतात, तेव्हा ते या गोष्टीला विरोध करतात आणि त्यांना अभ्यासात लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय मनमोहनसिंग हे राजनाथ सिंह यांच्याकडे बाहेर जाण्यासाठी हट्ट करत आहेत. हे चित्र डोळ्यासमोर येवून गेले असल्यास जरा थांबा. बातमी पुढे आहे.

वर सांगितलेली गोष्ट वाचायला आणि ऐकायला जरी विचित्र आणि एकमेकांशी पूर्णपणे असंबंधित वाटत असली तरी हे चित्र आज उत्तरप्रदेशमधील एका घरामध्ये पाहायला मिळत आहे. होय उत्तर प्रदेशमध्ये एक घर असं आहे जिछे बाळ ठाकरेंपासून-मनमोहनसिंग आणि कल्याणसिंह ते मुलायमसिंह यांच्यापर्यंत सगळे छताखाली राहायला असून ते सर्वजण भाजपचे मतदार आहेत.

भारतात राजकारण्यांच्या नावांवरुन पाल्यांची नाव ठेवण्यीची पद्धत नवीन नाही. अगदी इंग्लंडच्या राणीपासून ते देशाच्या राष्ट्रपतींच्या नावावरुन एखाद्या घरात मुलांचे नामकरण केले जाते. अशीच राजकारण्यांच्या मुलांची नाव उत्तर प्रदेशमधील मिठाईलाल नावाच्या एका शेतकऱ्याने आपल्या ७ मुलांना दिली आणि एकाच घरात ही सगळी राजकारणी मंडळी मोठे होवू लागली. उत्तर प्रदेशमधील आंबेडकर नगरच्या जलालपुर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या हैदराबाद या गावात हे कुटुंब राहतं.

मिठाई लाल सांगतात, लहानपणी शाळेत आपल्याला नावारुन चिडवले जायचे, तेव्हाच ठरवंल की आपण मुलांची अशी नाव ठेवायची की कोणी अपमान करण्याचा, चिडवण्याचं किंवा हसण्याचं धाडसं होणार नाही. मी माझ्या सन्मानासाठी ७ मुलांची नाव राजकारण्यांच्या नावावरुन ठेवली. मुलायम सिंह यांचं मेडिकल स्टोअरं आहे. तर कल्याणसिंह हे सीसीटीव्हीच्या फॅक्टरीमध्ये कामाला आहेत. ज्ञानी झैलसिंग यांचे स्वतःचे फर्निचरचे दुकान आहे. तर राजनाथसिंह हरियाणामध्ये एका कारखान्यामध्ये कामाला आहेत.

मनमोहनसिंग आणि बाळ ठाकरे हे अजून लहान असून ते शाळेत शिकतात. तर मिठाईलाल यांची मुलगी जयललिता हिचा २०१३ मध्ये मृत्यू झाला. आपल्या पुढील आयुष्याबद्दल सांगताना ज्ञानी झैलसिंह सांगतात, मी पुढे माझ्या फर्निचरच्या दुकानाचा विस्तार करणार आहे. तर बाळ ठाकरे यांना मोठं होवून एक नावाजलेला क्रिकेटर होण्याचं आणि भारतासाठी खेळण्याचं स्वप्न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT