UP Election 2022
UP Election 2022 sarkarnama
देश

UP Election 2022: केशव प्रसाद मौर्य यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये आज (रविवारी) पाचव्या टप्प्यातील विधानसभा मतदारसंघात (UP Election 2022) मतदानास सुरवात झाली आहे. १२ जिल्ह्यातील ६१ जागांवर मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. उत्तरप्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya)यांच्यासह अनेक मंत्र्यांचे राजकीय भवितव्य मतदान मशिनमध्ये बंद होणार आहे.

राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये मतदान होत असून यामध्ये अमेठी, रायबरेली, सुलतानपूर, चित्रकूट, प्रतापगड, कौशांबी, प्रयागराज, बाराबंकी, अयोध्या, बेनरिक, श्रावस्ती आणि गोंडा यांचा समावेश आहे.

राज्य सरकारच्या सहा मंत्र्यांसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य कौशांबीतील सिरथू येथून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांची बहीण आणि अपना दल कामेरवाडीच्या पल्लवी पटेल यांच्या विरोधात होणार आहे. सपाच्या निवडणूक चिन्हावर त्या निवडणूक लढवत आहेत.

अनुप्रियाची यांची आई कृष्णा पटेल प्रतापगड सदरमधून अपना दल कामेरवाडीतून निवडणूक लढवत आहेत. प्रतापगडमधून ग्रामीण विकास मंत्री राजेंद्र प्रताप सिंह उर्फ ​​मोती सिंह निवडणूक रिंगणात आहेत. खादी आणि ग्रामोद्योग मंत्री सिद्धार्थनाथ सिंह अलाहाबाद पश्चिममधून उमेदवार आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनीही जाहीर सभा घेतल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चित्रकूट, प्रयागराज आणि सुलतानपूरमध्ये जाहीर सभा घेतल्या, रोड शोही केला. त्याचवेळी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अयोध्येच्या बहराइचमध्ये सभा घेतल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT