Swami Prasad Maurya
Swami Prasad Maurya Sarkarnama
देश

भाजप अडचणीत : मुख्यमंत्री योगींचे दिल्लीत पाऊल अन् मंत्र्यानं दिला झटका

सरकारनामा ब्युरो

लखनौ : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तारखा जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) राजकारण तापलं आहे. भाजपच्या (BJP) उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह बडे मंगळवारी (ता. 11) दिल्लीत दाखल झाले आहे. त्यानंतर काही तासांतच त्यांच्या सरकारमधील मंत्र्याने तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यात विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला मोठा धक्का बसला आहे.

स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे पाठवला आहे. मौर्य यांनी भाजपला रामराम करून समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. ते योगी सरकारमध्ये कामगार मंत्री होते.

राजीनामा दिल्यानंतर मौर्य म्हणाले, मंत्री असताना विपरीत स्थिती आणि विचारधारेमध्ये राहून खूप काम केले आहे. मात्र दलित, मागासवर्ग, शेतकरी, बेरोजगार तरूण आणि छोटे व मध्यम व्यापाऱ्यांकडे खूप दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मी मंत्रिमंडळातून राजीनामा देत असल्याचे मौर्य यांनी स्पष्ट केलं. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी थेट समाजवादी पक्षात प्रवेश केला.

मागील काही दिवसांपासून मौर्य हे अखिलेश यादव यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. मागील निवडणुकीत भाजपला जातीच्या राजकारणाने सत्तेत पोहचवल्याचे मानले जाते. दलित, मागासवर्गाच्या मतदानाचा टक्का अधिक असल्याने अखिलेश यादव यांनीही आता या जातींकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे भाजपमधील या नेत्यांनाही आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यातूनच मौर्य यांचा पक्षप्रवेश झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान, योगी आदित्यनाथ मंगळवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी दिल्लीत पाऊल ठेवताच पहिला मोठा धक्का बसला. दिल्लीत उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. पुढील एक दोन दिवसांत नावांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. काही विद्यमान आमदारांची तिकीटे कापली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजपला आणखी धक्के बसू शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT