UP Police 
देश

वातावरण बिघडवणाऱ्यांना दिसता क्षणी गोळी घाला- युपी पोलिसांचे फर्मान

सरकारनामा ब्युरो

कानपूर : देशातील पाच राज्यांच्या निवडणूक प्रक्रियांचा अखेरचा टप्पा पार पडला. उत्तरप्रदेशतील सात टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. उद्याचा दिवस या पाचही राज्यांसाठी निर्णायक ठरणार आहे. यासाठी उत्तरप्रदेशातील (Uttar pradesh) सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी 10 मार्च रोजी होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. (UP assembly election result 2022 latest news)

मतमोजणी प्रक्रियेच्या पार्श्वभुमीवर कानपूर देहातचे डीएम जितेंद्र प्रताप सिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी डीएमसह एसपी स्वप्रिल ममंगाई देखील उपस्थित होते. कानपूर देहातमध्ये 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन तयारीत व्यस्त आहे. उत्तरप्रदेशच्या . मतमोजणीच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना आणि मतमोजणीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत अडथळा आणणार्‍यांना, दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरविणार्‍यांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतमोजणी प्रक्रियेचे उल्लंघन करणाऱ्यांना जागेवरच गोळ्या घालण्याचे आदेश ही पहिलीच वेळ आहे.

एसपी स्वप्रिल ममंगाई म्हणाले की, मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी पूर्ण तयारी झाली आहे. यावेळी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. या काळात कोणी अफवा पसरवल्यास त्याच्यावरही कडक कारवाई केली जाणार आहे. तर वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला, तर दिसता क्षणी गोळ्या घालण्याच्या सूचनाही देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

मतमोजणीसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात आली आहे. कानपूर ग्रामीण भागातील पोलीस आणि प्रशासनाकडून मतमोजणी प्रक्रियेसाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हाभरातून 1500 पोलीस, 2 कंपनी CISF, 2 कंपनी CRPF, 1 कंपनी PAC तैनात करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 च्या विधानसभा निवडणूक काळात झालेल्या हिंसच्या तुलनेत यावेळी कमी हिंसक घटना घडल्या आहेत. 2017 मध्ये निवडणुकी दरम्यान हिंसाचाराच्या एकूण 97 घटना घडल्या. तर यावेळी जवळपास 33 घटनांची नोंद झाली आहे. . पोलिसांच्या आकडेवारीनुसार, 9 जानेवारी रोजी आचारसंहिता लागू झाल्यानंतर, राज्यभरात 1339 एफआयआर नोंदवण्यात आले, तर लखनौ झोनमध्ये सर्वाधिक 261 एफआयआर नोंदवण्यात आले. यासोबतच कानपूरमधूनच सर्वाधिक रोकड जप्त करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT