Tahawwur Rana Sarkarnama
देश

Video Tahawwur Rana: 26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

सरकारनामा ब्यूरो

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यारपणाची शक्यता वाढली आहे. राणाला भारताकडे सोपावलं जाऊ शकतं असा निर्वाळा अमेरिकेतील कोर्टाचा दिला आहे. प्रत्यार्पणाच्या विरोधातील राणाची (Tahawwur Rana) याचिका कोर्टाने फेटाळली आहे. २६/११ च्या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता.

२६/११ च्या कटात सहभागी असलेल्या डेव्हिड कोलमन हेडलीला मुंबईतील लक्षांवर रेकी करण्यास मदत केल्याचा आणि लष्कर-ए-तय्यबा ला लॉजिस्टिकल सपोर्ट केल्याचा आरोप राणावर आहे. अमेरिकेबाहेर मुंबई आणि कोपनहेगन येथे दहशतवादी कटात सहभागाप्रकरणी २००९ मध्ये FBI ने राणाला अटक केली आहे.

भारताने राणाचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना अडथळा निर्माण करण्यासाठी तहव्वूर राणाने न्यायालयात दाद मागितली होती. दोन्ही देशातील प्रत्यार्पण करारानुसार राणाला भारतात पाठवल जाऊ शकते, सुनावणी होईपर्यंत आपल्याला हिंदुस्थानाच्या ताब्यात देऊ नका, अशी विनंती त्याने याचिकेत कोर्टाकडे केली होती. त्याची याचिका कोर्टाने फेटाळल्यामुळे त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कॅनडाचा नागरिक असलेला तहव्वूर राणा सध्या अमेरिकेतील तुरुंगात आहे. मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी (26/11 Mumbai Attacks) अतिरेकी हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप राणावर आहे.

कॅलिफोर्नियाच्या मध्यवर्ती जिल्हा न्यायालयाने आधी राणाला भारताच्या ताब्यात दिले जाऊ शकते असा निकाल दिला होता. या निकालाविरोधात राणाने अमेरिकेच्या कोर्ट ऑफ अपील येथे दाद मागितली होती.

राणाविरूद्ध भारताचे असणारे आरोप स्वतंत्र आहेत. अमेरिकेत ज्या गुन्ह्यांसाठी त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती त्यापेक्षा बरेच वेगळे होते. सामूहिक हल्ले करणाऱ्या दहशतवादी संघटनेला राणाचा पाठिंबा असल्याचे ‘पुरेसे सक्षम पुरावे’ भारताने सादर केले असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे.

यापूर्वी राणाला परदेशी दहशतवादी संघटनेला पाठबळ देणे तसेच डेन्मार्कमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी आखण्यात आलेल्या निष्फळ कटाला पाठबळ देण्यासाठी कट रचल्याबद्दल एका न्यायाधीशांनी दोषी ठरवले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT