New Delhi News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal News) यांना ईडीने अटक केल्यानंतर संपूर्ण देशात त्याचे पडसाद उमटले. आता जगभरातूनही त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्यावर अमेरिकेतून प्रतिक्रिया आल्यानंतर केजरीवालांच्या अटकेवरही आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून त्याला कसे प्रत्युत्तर दिले जाणार, याबाबत उत्सुकता आहे.
केजरीवालांच्या अटकेवर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘आम्हाला निष्पक्ष, समयबद्ध आणि पारदर्शक कायदेशीर प्रक्रियेची भारत सरकारकडून अपेक्षा आहे.’ रॉयटर्स या न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी एका प्रश्नाला हे उत्तर दिले आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर प्रश्न विचारल्यानंतर हे प्रवक्ते म्हणाले, ‘अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर आमची नजर आहे. आम्ही मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासाठी पारदर्शक कायदेशीर प्रक्रियेची अपेक्षा करतो.’ अमेरिकेआधी (USA) जर्मनीतूनही केजरीवालांच्या अटकेवर प्रतिक्रिया आली होती.
जर्मनी दूतावासाच्या उपप्रमुखांनी म्हटले होते की, ‘आरोपांचा सामना करणारे केजरीवाल यांना इतर कोणत्याही भारतीय नागरिकाप्रमाणे निष्पक्ष सुनावणीचा अधिकार होता.’ त्यावर भारताकडूनही लगेच प्रत्युत्तर देण्यात आले होते. भारताच्या (India) परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा हा हस्तक्षेप असल्याचे म्हटले होते.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले होते की, नवी दिल्लीतील जर्मनीच्या दूतावासाच्या उपप्रमुखांना याबाबत फटकारण्यात आले आहे. आमच्या देशांतर्गत प्रकरणांमध्ये जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांच्या प्रतिक्रियेविरोधात स्पष्ट नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
केजरीवाल जेलमधून देतात आदेश
ईडीच्या (ED) कोठडीत असलेले केजरीवाल सध्या ईडीच्या कोठडीतून सरकार चालवत आहेत. आतापर्यंत त्यांनी दोन आदेश दिल्याचा दावा दिल्ली सरकारमधील मंत्र्यांनी केला आहे. आज त्यांनी दिल्लीतील रुग्णालये व मोहल्ला क्लिनिकमध्ये मोफत औषधे मिळणे सुरू राहायला हवे, असे आदेश दिल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. तसेच त्यांना दिल्लीकरांची चिंता असल्याचेही ते म्हणाले.
भाजप आक्रमक
केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने (BJP) केली आहे. जेलमधून सरकार चालवता येऊ शकत नाही. ते दिल्लीकरांच्या समस्यांवर निर्णय घेऊ शकत नसल्याने राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. तसेच त्यांनी जेलमधून घेतलेल्या निर्णयावरही साशंकता व्यक्त केली आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.