rajeshwar singh
rajeshwar singh sarkarnama
देश

EDचे माजी अधिकारी राजेश्वर सिंह यांचा ५५ हजारांनी दणदणीत विजय

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील लखनैा येथील सरोजिनी नगर विधानसभा मतदार संघातून (Uttar pradesh assembly polls 2022) भाजपचे उमेदवार ईडीचे माजी सहसंचालक राजेश्वर सिंह (rajeshwar singh) हे विजयी झाले आहेत. त्यांनी समाजवादी पार्टीचे उमेदवार अभिषेक मिश्रा यांचा पराभव केला आहे. राज राजेश्वर सिंह यांचा ५५ हजार मतांनी विजय झाला आहे.

''हा विजय सरोजिनी नगर येथील जनतेचा आहे. कार्यकर्त्यांनी मेहनत आणि जनतेचा विश्वास यामुळे हा विजय मिळाला. सगळ्याचे आर्शीवादाचे प्रमाणपत्र म्हणजे हा विजय आहे,'' अशा भावना राजेश्वर सिंह यांनी निवडणूक आल्यानंतर जनतेशी संवाद साधताना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. सिंह हे उत्तर प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.

राजेश्वर सिंह यांनी १ फेब्रुवारी रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सनदी अधिकारी असलेले राज राजेश्वर सिंह हे दहा वर्ष उत्तर प्रदेश सरकारच्या पोलिस दलात, तर १४ वर्ष ईडीमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होते. ते आयआयटीतून अभियंत्रा झाले आहेत. कायदा आणि मानव अधिकार या विषयातील ते पदवीधर आहेत.

सेवानिवृत्तींच्या दिवशी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. सरोजनी नगरच्या विद्यमान भाजपच्या आमदार स्वाती सिंह यांचे तिकीट कापून त्यांना भाजपने तिकीट दिले होते. या मतदार संघातून स्वाती सिंह यांचे पती भाजपचे उपाध्यक्ष दयाशंकर सिंह हे देखील निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक होते.

राजेश्वर सिंह हे प्रशासकीय सेवेत असताना त्यांच्याकडे समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्यावर असलेल्या भष्ट्राचार प्रकरणाचा तपास होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT