Uttar Pradesh Politics : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसला. मागील निवडणुकीत 60 हून अधिक खासदार असलेल्या भाजपला या निवडणुकीत निम्माही आकडा गाठता आला नाही. समाजवादी पक्षाने अनपेक्षितपणे 37 जागांवर विजय मिळवत सर्वांनाच धक्का दिला.
लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभा पोटनिवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. राज्यातील विविध पक्षांच्या नऊ आमदारांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. या आमदारांना राजीनामा द्यावा लागणार असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे.
अखिलेश यादव हे कनौज लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहे. त्यामुळे त्यांनी बुधवारी आमदारकीचा राजीनामा दिला. ते करहल मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते. सपाचे खासदार अवधेश प्रसाद आणि भाजपचे खासदार जितीन प्रसाद यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला आहे. जितीन प्रसाद राज्यात मंत्री होते. अवधेश यांनी फैजाबाद मतदारसंघातून संसद गाठली आहे. याच मतदारसंघात राम जन्मभूमी अयोध्या आहे.
अखिलेश, जितीन प्रसाद, अवधेश प्रसाद यांच्याशिवाय आणखी सहा आमदारांना खासदारकी मिळाली आहे. सपा आमदार लालजी वर्मा, जियाऊर रहमान बर्क, अतुल गर्ग, भाजप आमदार प्रवीण पटेल, निषाद पक्षाचे आमदार विनोद कुमार बिंद आणि राष्ट्रीय लोकदलाचे चंदन चौहान लोकसभेत पोहचले आहेत.
महाराष्ट्रामध्येही सहा आमदारांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यामध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, बळवंत वानखेडे आणि प्रणिती शिंदे, शिवसेनेचे रविंद्र वायकर आणि संदीपान भूमरे यांचा समावेश आहे. मात्र, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी जेमतेम पाच महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.