Uttar Pradesh Crime Sarkarnama
देश

BJP leader murder : मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची चाकूने सपासप वार करत निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

Uttar Pradesh Crime: मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्यावर चाकूने हल्ला करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Rashmi Mane

मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्हातील चिलुआताल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरगदवा परिसरात मंगळवारी सकाळी ही घडना घडली आहे. मृत झालेल्या व्यक्तीचे नाव राजकुमार चौहान असे असून ते स्थानिक पातळीवरील राजकारणात सक्रिय होते.

मिळालेल्या माहिती, राजकुमार चौहान हे नेहमीप्रमाणे सकाळी चालण्यासाठी बाहेर पडले होते. त्यावेळी काही अद्यात व्यक्तींनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्यावर सलग धारदार शस्त्राने ५० ते ६० वेळा सपासप वार करण्यात आले. या भीषण हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागेवरच मृत्यु झाला.

या घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसेच घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याचे काम देखील सुरु आहे. या संपूर्ण घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्यांच्या मते हल्लेखोरांनी अत्यंत क्रुरपणे चौहान यांच्यावर वार केले. हल्ला इतका भयानक होता की त्यांनी जागीच प्राण सोडले. मात्र, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, पोलीसांनी या प्रकरणातील अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांच्याविरोधात शोध मोहिम सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही चुकीचे प्रकार घडू नये यासाठी पोलिस सर्तक झाले असून नागरिकांकडून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT