Uttar Pradesh Politics Sarkarnama
देश

Uttar Pradesh Politics : मोदींना भिडणाऱ्या काँग्रेस नेत्याच्या मतदारसंघात 'सपा'ने दिला उमेदवार; 'इंडिया'चं काय होणार?

Akhilesh Yadav News : दोन वेळा मोदींशी दिली लढत...

Chetan Zadpe

Uttar Pradesh News : सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधातातली इंडिया आघाडी उत्तर प्रदेशनध्ये तुटली का असा प्रश्न निर्माण होत आहे. यापूर्वी आरएलडी हा पक्ष काँग्रेसपासून दुरावला आता समाजवादी पार्टीही काँग्रेसपासून दूर झाली का? अशी स्थिती दिसत आहे.

कारण सपाने आज लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांची जागा असलेल्या वाराणसीसाठीही सपाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. (Latest Marathi News)

काँग्रेससाठी अमेठी आणि रायबरेलीनंतर वाराणसी ही यूपीमधील एकमेव जागा होती, जी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला गमवायची नाही. वाराणसी हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांचा होम ग्राऊंड आहे.

गेल्या तीन वर्षांपासून ते सातत्याने येथून निवडणूक लढवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने अजय राय यांना तिकीट दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

समाजवादी पक्षाने वाराणसीतून माजी मंत्री सुरेंद्र सिंह पटेल यांना उमेदवारी दिली आहे. सुरेंद्र सिंह पटेल हे रोहनिया मतदारसंघातून आमदार आहेत. यापूर्वीही सपाने त्यांना लोकसभा मतदारसंघात उतरवले आहे.

सपा आणि काँग्रेसची युती झाल्यास वाराणसीची जागा काँग्रेसकडे जाईल हे आधीच स्पष्ट झाले होते. अजय राय हेच पुन्हा काँग्रेसकडून मोदींविरोधात मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित झाला आहे. मात्र, याबाबत काँग्रेसकडून अद्याप कोणतीही पुष्टी झाली नाही.

आता सपाची तिसरी यादी जाहीर झाली असून यात काँग्रेसच्या जागेवर सपाने उमेदवार घोषित केला आहे. काल (19 फेब्रुवारी) सपाने काँग्रेसला 17 जागांची ऑफर दिली होती. त्यांची ऑफर स्वीकारल्यानंतरच अखिलेश यादव रायबरेलीमध्ये राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होतील, असे सांगण्यात आले. रायबरेलीतून यात्रा पार पडली आणि सपाची यादी आल्याने दोन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचे चित्र दिसत आहे.

काँग्रेसच्या 17 जागांमध्ये वाराणसीचाही समावेश होता -

सपाने नुकतीच 17 लोकसभा जागांची यादी काँग्रेसचे (Congress) प्रभारी अविनाश पांडे यांना पाठवली होती. यामध्ये अमेठी, रायबरेलीसह वाराणसीचेही नाव होते. आता सपानेच वाराणसीतून उमेदवार दिला आहे.

याशिवाय अमरोहाही या यादीत होते. आजच्या सपाच्या यादीतअमरोहामधूनही एक उमेदवार उभा केला आहे. याशिवाय कानपूर, फतेहपूर सिक्री, बसनगाव, सहारनपूर, प्रयागराज, महाराजगंज, झांसी, बुलंदशहर, गाझियाबाद, मथुरा, हाथरस, बाराबंकी आणि देवरिया या 17 जागांचा समावेश होता.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT