mp sanghamitra, Swami Prasad Mourya sarkarnama
देश

भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या मंत्र्यांचा सपामध्ये प्रवेश नाही ; कन्या भाजप खासदार संघमित्रा म्हणाल्या..

स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षाचा झेंडा हाती घेतला असल्याचे बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

लखनौ :उत्तरप्रदेश निवडणुकीची (Uttar Pradesh Assembly Election 2022) रणधुणाळी सुरू झाली असून मंगळवारी योगी सरकारमध्ये मंत्री असलेले स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Mourya) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी समाजवादी पार्टीत (samajwadi party) प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. पण हे वृत्त खोटे असल्याचे त्यांची कन्या भाजपच्या खासदार संघमित्रा bjp mp sanghamitra) यांनी रात्री उशिरा सांगितलं. त्यामुळे स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समाजवादी पक्षातील प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षाचा झेंडा हाती घेतला असल्याचे बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. सपाचे नेते, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (akhilesh yadav)यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. अखिलेश यादव यांनी एक फोटो ट्विट करत म्हटलं, "सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढणारे लोकप्रिय नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्यासोबत समाजवादी पक्षात आलेले इतर नेते, कार्यकर्ते या सर्वांचे हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा."

स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा ट्विटरवरुन दिला आहे. दलित, मागास, शेतकरी, बेरोजगार युवक आणि व्यापाऱ्यांची घोर उपेक्षा झाल्यामुळे मी योगी मंत्रिमंडळातून राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण ते कुठल्या पक्षात जाणार याबाबत त्यांनी स्पष्टीकरणं केलं नव्हतं. पण माध्यमांनी ते समाजवादी पक्षात दाखल झाल्याचे वृत्त दिलं होते. त्यावर त्यांनी कन्या भाजपच्या खासदार संघमित्रा यांनी स्पष्टीकरण केलं आहे.

खासदार संघमित्रा म्हणाल्या की माझे वडील स्वामी प्रसाद मौर्य यांनी कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. येत्या दोन दिवसात ते आपल्या पुढील राजकीय प्रवासाविषयी सर्वांना सांगणार आहेत. त्यांनी कुठल्याही पक्षाला त्यांच्यामध्ये सामील होण्याची सहमती दिलेली नाही.

अखिलेश यादव यांच्या टि्वटबाबत संघमित्रा म्हणाल्या, ''अखिलेश यांच्या वडिलांनी यापूर्वीही माझ्या वडिलांचा फोटो व्हायरल केला होता,'' ''२०१६ मध्ये माझ्या वडिलांनी बसपाचा राजीनामा दिला होता. तेव्हा शिवपाल यादव यांनी असाच एक फोटो समाजमाध्यमांवर शेअर केला होता. त्यानंतर माझे वडिल हे शिवपाल यादव यांच्यासोबत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या,'' असे संघमित्रा म्हणाल्या.

स्वामी प्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेशमधील मागास समाजाचा मोठा चेहरा समजले जातात. स्वामी प्रसाद मौर्य हे पाच टर्म आमदार असून त्यांची राजकीय कारकीर्द तब्बल 40 वर्षांची आहे. मायवतींसोबत बसपाचा चेहरा म्हणून ते २०१६ पर्यंत ते बसपामध्ये होते. २०१७ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा विधानसभेत निवडून गेले. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळालं होतं. पडरौना विधानसभा क्षेत्रातून ते विजयी झाले होते. पडौरना मतदारसंघातून ते सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT