Uttar Pradesh News  Sarkarnama
देश

Uttar Pradesh : धक्कादायक : मतपेट्यांवर पाणी अन् तेजाब टाकल्याने नवा वाद ; ८० जणांवर गुन्हा दाखल..

Uttar Pradesh News : बिल्हौर याठिकाणी ६९.१५ टक्के मतदान झाले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Uttar Pradesh pouring water acid on ballot boxes : उत्तरप्रदेशमधील बिल्हौर नगरपालिका निवडणूक प्रक्रियेत वाद निर्माण झाला आहे. तीन मतदान केंद्रात मतपेट्यांवर पाणी आणि तेजाब टाकण्याचा प्रकार झाल्याचे समोर येत आहे.

याप्रकरणी ८० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिल्हौर नगरपालिकेच्या याच तीन मतदान केंद्रात सर्वात जास्त मतदान झाले आहे. याच ठिकाणी हा प्रकार झाला आहे. याठिकाणी ६९.१५ टक्के मतदान झाले आहे.

इस्लामिया स्कूल येथील दोन वार्डाच्या मतपेटीत हा गैरप्रकार झाल्याचे आढळले आहे. त्यानंतर या ठिकाणी काल (शुक्रवारी) पुन्हा मतदान घेण्यात आले. ११ मे रोजी येथे झालेल्या मतदानात सांयकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास २५ जण अचानक घुसले त्यांनी मतपेट्यांवर पाणी आणि तेजाब टाकल्याचे पोलिसांनी सांगितले. असेच प्रकार अन्य दोन ठिकाणी झाले आहेत.

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेस समर्थकांनी एआयसीसी मुख्यालयाबाहेर जल्लोष केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मिठाई वाटताना दिसले. तसेच, हनुमानाला मिठाईचा नैवेद्यही दाखवण्यात आला.

कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. त्यानंतर काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बंगळुरुमध्ये हलवण्यात येणार आहे. बहुमत न मिळाल्यास सर्व आमदारांना अज्ञातस्थळी हलवण्यात येणार आहे.

एआयसीसीचे सरचिटणीस आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला, डीके शिवकुमार आणि माजी उपमुख्यमंत्री जी. परमेश्वरा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानी बैठक घेतली. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेदेखील पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. सध्या त्यांच्या हातावर उपचार सुरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT