V.K.Sasikala  
देश

तमिळनाडूत राजकीय भूकंप! शशिकला थेट पोचल्या जयललितांच्या स्मृतिस्थळी

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांनी राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली आहे.

सरकारनामा ब्युरो

चेन्नई : तमिळनाडूच्या (Tamil Nadu) माजी मुख्यमंत्री जयललिला (Jayalalithaa) यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला (V.K.Sasikala) यांनी राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली आहे. परंतु, शशिकलांनी आज सगळ्यांनाच मोठा धक्का दिला. त्या थेट आज जयललितांच्या स्मृतिस्थळी पोचल्या. तेथे साश्रूनयनांनी त्यांनी आपल्या मैत्रिणीला आदरांजली वाहिली. त्यांच्या या भेटीने राज्यात नवीन राजकीय भूकंपाची नांदी झाल्याचे मानले जात आहे.

विशेष म्हणजे अण्णाद्रमुक पक्षाचा सुवर्णमहोत्सव उद्यापासून (ता.17) साजरा होत आहे. त्याआधी एक दिवस आधीच आज शशिकला या मरिना बीचवर पोचल्या. त्यांना जयललितांसोहत माजी मुख्यमंत्री एम.जी.रामचंद्रमन आणि अण्णादुराई यांच्या स्मारकालाही भेट देऊन आदरांजली वाहिली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात अण्णाद्रमुकचे कार्यकर्ते उपस्थित होते. शशिकला या पुन्हा राजकारणात सक्रिय होत असल्याचे संकेत त्यांना आज दिले आहेत, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. शशिकला यांनी 3 मार्चला राजकारणातून निवृत्ती घेतली होती.

एमजीआर आणि जयललिता हे कार्यकर्ते आणि पक्षाला वाचवतील, याचा मला विश्वास आहे. पक्षाला चांगले भविष्य आहे. माझ्या हृदयातील सर्व ओझे मी अम्मांच्या स्मृतिस्थळी उतरवून आले आहे, असे शशिकला या जयललिताच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर म्हणाल्या. राज्यात द्रमुकची सत्ता येण्यास मदत केल्याचा ठपका आपल्यावर ठेवला जाऊ नये, यासाठी शशिकलांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते. आता त्या पुन्हा एकदा पक्षावर दावा सांगण्यास पुढे सरसावल्याचे मानले जात आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर पडल्यानंतर शशिकलांनी जयललितांच्या स्मृतिस्थळी भेट दिली होती. त्यानंतर आज त्यांनी दुसऱ्यांदा ही भेट दिली आहे.

जयललिता यांच्या निधनानंतर शशिकलांनी पनीरसेल्वम यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घेतला होता. नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

शशिकलांच्या सुटकेनंतर त्यांना पक्षात न घेण्यास मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांचा सर्वांत जास्त विरोध होता. पलानीस्वामी हे सरकारचे तर पनीरसेल्वम हे पक्षाचे नेतृत्व करीत होते. नंतर पनीरसेल्वम यांनी शशिकलांना पुन्हा एकदा पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते. यामागे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष अडचणीत आल्याचे कारण होते. मात्र, शशिकलांनी याला कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. त्यांनी थेट निवृत्ती जाहीर केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT