Supreme Court acknowledges SIT report granting Vantara Jamnagar a clean chit, confirming compliance in animal conservation practices. Sarkarnama
देश

Vantara : कोल्हापुरातील माधुरी हत्तीणीमुळे अडचणीत आलेल्या अंबानींच्या 'वनतारा'ला 'एसआयटी'कडून 'क्लिन चिट'

Vantara Clean Chit : गुजरातच्या जामनगर येथील 'वनतारा' प्राणी संवर्धन व पुनर्वसन केंद्राला कथित अनियमिततेच्या आरोपांतून क्लिन चिट मिळाली आहे. चौकशीसाठी नियुक्त केलेल्या एसआयटीने वनतारा क्लिन चिट दिल्याचं सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं आहे.

Jagdish Patil

Navi Delhi News, 16 Sep : गुजरातच्या जामनगर येथील 'वनतारा' प्राणी संवर्धन व पुनर्वसन केंद्राला कथित अनियमिततेच्या आरोपांतून क्लिन चिट मिळाली आहे. चौकशीसाठी नियुक्त केलेल्या एसआयटीने वनतारा क्लिन चिट दिल्याचं सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं आहे.

कोल्हापुरातील नांदणी मठाच्या हत्तीणीला अंबानी यांच्या 'वनतारा' प्रकल्पात नेण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर वनतारा हे केंद्र खूप चर्चेत आले होते. वनतारा प्रकल्पात अनियमितता होत असल्याची तक्रार समाजसेवी संघटना व वन्यजीव संरक्षण संघटनांनी दिली होती.

या तक्रारींच्या आधारे 2 जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात वनतारामध्ये आणलेल्या प्राण्यांच्या स्थलांतराविषयी आवश्यक असलेल्या कायदेशीर प्रक्रियांचे पालन न केल्याचा आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणावर सुनावणी करताना 25 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने चार सदस्यीय विशेष तपास पथक नेमण्याचे निर्देश दिले होते.

खंडपीठाने माजी न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती चौकशीसाठी नेमली. याच समितीच्या पथकाने वनतारामधील कामकाजाची शहानिशा करून त्याचा अहवाल 12 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झाल्याची माहिती न्या. पंकज मिथल आणि न्या. प्रसन्ना वराले यांच्या खंडपीठाने दिली.

त्यानंतर 'नियमांचे पालन झाले असेल, तर हत्तींना रिलायन्स फाऊंडेशनच्या वनतारा प्राणी संवर्धन केंद्रामध्ये ठेवण्यात वावगे काय आहे? असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने गुजरातच्या जामनगरमधील वनतारा प्राणी संवर्धन व पुनर्वसन केंद्राच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने त्याला क्लिन चिट दिल्याचं सांगितलं.

तर 'वनतारा' केंद्राने नियमावलीचे पालन केल्याचं 'एसआयटी'चे म्हणणे असल्याचंही खंडपीठाने सांगितलं आहे. अनंत अंबानी यांच्या 'वनतारा' केंद्राची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी मांडली. ज्या देशांमध्ये प्राण्यांची शिकार केली जाते, असे देश 'वनतारा'च्या कामाला आक्षेप घेत आहेत, असा युक्तीवाद त्यांनी केला.

तसंच 'वनतारा'कडून सर्वोच्च न्यायालयाला पूर्ण सहकार्य केले जात आहे. अहवालात काही बाबी गोपनीय आहेत. त्या सार्वजनिक केल्या जाऊ नयेत, असे साळवे यांनी सांगितलं. 'आम्ही जाणीवपूर्वक हा अहवाल उघडलेला नाही. गरज असल्यास आम्ही तो पाहू आणि जर काही आदेश द्यावयाचा असेल तर तो देऊ,' अशी टिपणी न्या. मिथल यांनी केली.

'समितीने कमी वेळेत काम पूर्ण केले आहे, त्याचे आम्ही कौतुक करतो. या प्रकरणात लक्ष घालण्याची सुरुवातीपासून आमची इच्छा नव्हती. मात्र, आरोप समोर आल्यानंतर लक्ष घालावे लागले,' असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT