Ajay Rai celebration Sarkarnama
देश

Narendra Modi Vs Ajay Rai : सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये मोदींना पिछाडीवर टाकणाऱ्या अजय राय यांचा विजयी जल्लोष; 14 महिन्यांनी वाटली मिठाई

Ajay Rai’s Initial Lead Over Narendra Modi in Varanasi : वाराणसी लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये सुरूवातीच्या काही फेऱ्यांमध्ये नरेंद्र मोदी पिछाडीवर पडले होते. तर अजय राय यांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे निकालाबाबत उत्सुकता वाढली होती.

Rajanand More

Ajay Rai celebrates in Varanasi : लोकसभा निवडणुकीला आता एक वर्षांचा काळ उलटून गेला आहे. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वोट चोरीच्या आरोपांमुळे लोकसभेसह त्यानंतर झालेल्या सर्वच विधानसभा निवडणुकांवर नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एकीकडे काँग्रेसकडून त्याविरोधात देशभरात रान उठविले जात असताना आज वाराणसीमध्ये मात्र थेट विजयी जल्लोष पाहायला मिळाला.

उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांचा हा जल्लोष आहे. लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीच्या काही फेऱ्यांमध्ये राय आघाडीवर होते. पंतप्रधान मोदी पिछाडीवर पडल्याने सुरूवातीला मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा झाली होती. मात्र, नंतर मोदींनी मोठी आघाडी घेत विजय मिळवला होता.

राय यांच्या पराभवाला आता १४ महिने उलटले असले तरी बुधवारी विजयी जल्लोष करण्यात आला. समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते अजय राय यांच्या घरी गेले आणि वाराणसीचे खरे खासदार अशी घोषणाबाजी केली. त्यांना हार घातला, मिठाई वाटली. ढोल-ताशे वाजवले. हा विजयी जल्लोष म्हणजे एका उपरोधिक आंदोलनाचा भाग होता.

समाजवादी पक्षातील कार्यकर्त्यांनी दावा केला की, वाराणसीतील जनतेने अजय राय यांना विजयी केले होते. पण प्रशासकीय गडबडीमुळे निकाल वेगळा लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे. समाजवादी पक्षाच्या या प्रतिकात्मक आंदोलनात अजय राय यांनीही उत्साहात सहभाग घेतला. त्यांनीही कार्यकर्त्यांना मिठाई खाऊ घातली. सर्वांचे आदराने स्वागत केले.

माझ्यावर विश्वास टाकलेल्या वाराणसीतील साडे चार लाख मतदारांचा ऋणी असल्याची भावना राय यांनी यावेळी व्यक्त केली. काशीतील जनतेने दिलेला स्नेह आणि आशिर्वाद माझ्यासाठी अमूल्य असल्याचे सांगत त्यांनी मतदारयाद्यांमधील कथित घोळावरून टीकाही केली. ते म्हणाले, एकाच घरात वडिलांना पन्नास-पन्नास मुलं दिसतात, अशी येथील स्थिती आहे. सत्य सर्वांसमोर आहे, फक्त ते बोलण्याची हिंमत सगळ्यांमध्ये नाही.

अजय राय यांच्या या विजयी जल्लोषाची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे. याबाबत बोलताना राय यांच्या घरी गेलेले समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते अमन यादव म्हणाले, विद्यमान खासदार दीड लाख मतांनी पराभूत होत होते. पण काही अधिकाऱ्यांनी गडबड करत निकाल बदलला. वाराणसीतील जनतेसाठी त्यांचे खासदार इंडिया आघाडीचे उमेदवार अजय राय हेच आहेत. त्यांना प्रशासनाने नव्हे जनतेने मते देऊन निवडले आहे. त्यामुळे अजय राय हेच आमचे खरे खासदार आहेत, असे यादव म्हणाले.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT