Ashok Gehlot, Vasundhara Raje
Ashok Gehlot, Vasundhara Raje  Sarkarnama
देश

Rajasthan Politics : भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी वाचवलं होते आमचं सरकार ; काँग्रेस मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट, व्हिडिओ पाहा

सरकारनामा ब्यूरो

Vasundhara Raje saved the congress government : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot)यांनी त्यांच्या सरकारबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

"माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे (Vasundhara Raje) आणि विधानसभा माजीअध्यक्ष, आमदार कैलाश मेघवाल यांनी काँग्रेस सरकार पाडण्याच्या कुटील डावाला समर्थन दिले नाही, त्यामुळे आमचे सरकार वाचलं," असे अशोक गेहलोत म्हणाले. (vasundhara raje saved the congress government in rajasthan in 2020 see video)

अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांवरही निशाणा साधला. "काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी भाजपकडून घेतलेले पैसे परत दिले पाहिजे, कारण विना दबावाने ते काम करु शकतील," असा टोला गेहलोत यांनी लगावला आहे.

तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी १८ अन्य काँग्रेस आमदारांसह जुलाई २०२० मध्ये अशोक गेहलोत यांच्या विरोधात बंडखोरी केली होती. काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीने महिनाभरानंतर राजस्थान काँग्रेसमधील हे वादळ संपल होते. त्यानंतर सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आमि प्रदेशाध्यक्षपदावरुन हटविण्यात आले होते. या आमदारांना गेहलोत यांनी टोला लगावला आहे.

धौलपुर येथील एका कार्यक्रमात अशोक गेहलोत म्हणाले, "मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असताना भैरोंसिह शेखावत यांच्या नेतृत्वाखाली सरकार पाडण्यासाठी समर्थन देण्यास नकार दिला होता. कैलाश मेघवाल आणि वसुंधरा राजे यांनी सांगितले होते की निवडून आलेले सरकार पैस घेऊन पाडण्याची आमची परंपरा नाही,"

गेहलोत म्हणाले, "भैरोंसिंह शेखावत मुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षाच्या काही व्यक्तींनी सरकार पाडण्याचा डाव रचला होता. तेव्हाही आता सारखेच पैसे वाटप सुरु होते. काही जणा माझ्याकडे आले होते. तेव्हा मी काँग्रेसचा अध्यक्ष होतो. भैरोंसिंह शेखावत आजारी असल्यामुळे ते अमेरिकेला उपचार घेत आहेत. त्यांच्यामागे असे सरकार पाडण्याचे षडयंत्र करु नका, मी तुम्हाला मदत करणार नाही असे त्या लोकांना सांगितले होते,"

"भाजप आमदार शोभारानी यांनी वसुंधरा राजे आणि कैलाश मेघवाल यांची म्हणणं ऐकले. मलाही अशा षडयंत्रात सहभागी व्हायचे नाही. त्यामुळे आमचं सरकार वाचलं.माझ्याबाबतही अशीच घटना घडली. ती आयुष्यात कधीही विसरु शकणार नाही," असे गेहलोत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT