INDIA Alliance may field Tiruchi Siva against NDA candidate C.P. Radhakrishnan in the upcoming Vice President election. Sarkarnama
देश

Vice President Election : उपराष्ट्रपती पदासाठी काँग्रेस मोठा डाव टाकणार; राधाकृष्णन यांच्याविरोधात तिरुची शिवा?

Vice President Election 2025: NDA’s C.P. Radhakrishnan as Key Candidate : तिरुची शिवा हे डीएमकेचे ज्येष्ठ नेते असून पक्षाच्या प्रमुख रणनीतीकारांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. सध्या ते राज्यसभेचे खासदार असून दिल्लीतील पक्षाचे धोरण निश्चित करण्याची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आहे.

Rajanand More

INDIA Alliance Likely to Nominate Tiruchi Siva : दिल्ली सध्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे. एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता इंडिया आघाडीकडूनही त्यांच्याविरोधात उमेदवार देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे समजते. या चर्चेत खासदार तिरुची शिवा यांचे नाव आघाडीवर आहे. ‘डीएमके’कडूनही तशी मागणी केली असल्याचे समजते.

इंडिया आघाडीकडून तिरुची शिवा यांना उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. यामाध्यमातून काँग्रेस एका दगडात दोन पक्षी मारण्याच्या तयारीत आहे. राधाकृष्णन यांच्याप्रमाणे शिवाही तमिळनाडूतील आहे. त्यामुळे दोघांमध्येच लढत झाल्यास कुणीही जिंकले तरी उपराष्ट्रपतीपदी तमिळनाडूचाच नेता विराजमान होईल. यामाध्यमातून काँग्रेसकडून डीएमकेला ताकद देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

तिरुची शिवा हे डीएमकेचे ज्येष्ठ नेते असून पक्षाच्या प्रमुख रणनीतीकारांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. सध्या ते राज्यसभेचे खासदार असून दिल्लीतील पक्षाचे धोरण निश्चित करण्याची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आहे. राज्य पातळीवरील पक्ष संघटनेतही त्यांचा दबदबा आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे तमिळनाडूमध्ये राजकीय मायलेज घेण्याची भाजपच्या रणनीतीला सुरूंग लागू शकतो. डीएमकेलाही या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात ताकद दाखविण्याची संधी मिळू शकते.

तमिळनाडूमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक आहे. राधाकृष्णन यांच्या उमेदवारीकडे त्या अंगानेही पाहिले जात आहे. त्यामुळेच तिरुची शिवा यांची उमेदवारी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महत्वाची ठरू शकते. काँग्रेसकडून डीएमकेच्या नेत्याला उमेदवारी देण्यामागे आणखी मोठे कारण सांगितले जात आहे.

राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसकडून मित्रपक्षांना संधी दिली जात नसल्याचा आरोप यापूर्वी अनेकदा झाला आहे. तिरुची शिवा यांना उमेदवारी दिल्यास हा आरोप खोडून काढता येऊ शकतो. यामाध्यमातून काँग्रेसविषयी मित्रपक्षांमध्ये विश्वासार्हता वाढविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्याचा परिणाम राष्ट्रीय पातळीवर सकारात्मक दिसू शकतो, अशी आशा काँग्रेसला असेल. विशेषत: तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष या सातत्याने काँग्रेसच्या काही भूमिकांना विरोध करणाऱ्या मित्रपक्षांसाठी हा सूचक संदेश असेल.

दरम्यान, इंडिया आघाडीचा उमेदवार कुणीही असला तरी राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. असे असले तरी आघाडीकडून राजकीय एकजुट दाखविण्यासाठी शिवा यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. डीएमकेकडूनही त्यासाठी जोरदार मागणी केली जाण्याची शक्यता आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT