Vidhnsabha Election : आगामी काळात होत असलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका सर्वच राजकीय पक्षासाठी सत्त्वपरीक्षा पाहणाऱ्या ठरत आहेत. या निवडणुकांकडे मिनी लोकसभेच्या निवडणुका म्हणून पहिले जात असल्याने सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. या विधानसभा निवडणुका राजकीय पक्षांशिवाय अनेक दिग्गजांचे भवितव्य ठरणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मध्य प्रदेशात भाजपने (BJP) सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे भाजप पुन्हा सत्तेत आला तरी नेतृत्व सोपवले जाण्याची शक्यता कमी आहे. तर राजस्थानात काँग्रेसचे (Congress) मुख्यमंत्री अशोक गेहलोत पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता कमी असून, आले तरी त्यांना संधी मिळेल का ? याबाबत साशंकता आहे.
तेलंगणातील वातावरण सत्ताधारी विरोधी असल्याने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यापुढील अडचणीत वाढ झाली आहे. छत्तीसगडमध्येही काँग्रेस पुन्हा सत्तेत आली, तर भूपेश बघेल यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येकांना राजकीय भवितव्य ठरविण्यासाठी ही निवडणूक जिंकणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे या मिळालेल्या संधीचे सोने त्यांना करावे लागणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात या पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपचा कस लागणार आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपची स्थिती कमकुवत झाल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव जिव्हारी लागणार आहे. आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची स्थिती मजबूत असल्याचे सांगितले जात असले तरी या राज्यांमध्ये भाजपला कठीण आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
येत्या काळात केंद्र सरकारला मजबूत करण्यासाठी या राज्यांवरही मजबूत पकड असणे भाजपसाठी आवश्यक मानले जाते. त्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याशिवाय काँग्रेसच्यादृष्टीने ही निवडणूक सोपी वाटत असली तरी राजस्थानात (Rajasthan) त्यांना सत्ता टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्याचमुळे पाच राज्यांतील निवडणुका लोकसभेच्यादृष्टीने लिटमस टेस्ट ठरणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.