Former Gujarat CM Vijay Rupani’s connection to number 1206 sarkarnama
देश

Vijay Rupani - विजय रुपाणींचा 'लकी' नंबर '१२०६' अखेर त्यांच्यासाठी ठरला 'अनलकी', जाणून घ्या कसा?

Vijay Rupani and 1206 Number - अगदी पहिल्या स्कूटरपासून ते कारपर्यंत रूपाणींच्या सर्व वाहनांवर होता १२०६ लकी नंबर मात्र...

Mayur Ratnaparkhe

Vijay Rupani Lucky Number - गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचे गुरुवारी अहमदाबादेत घडेलेल्या भीषण विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. केवळ त्यांचाच नव्हे तर या विमान दुर्घटनेत विमानातील एकूण २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर अवघा देश स्तब्ध झाला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

तर या अपघातामुळे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानींबाबत एक दुर्दैवी योगायोग घडल्याचं समोर आलं आहे. खरंतर विजय रुपणींसाठी १२०६ हा लकी नंबर होता. एवढंच काय तर त्यांच्या स्कूटरपासून ते पहिल्या कारपर्यंत प्रत्येक वाहनाची नंबर प्लेट ही १२०६ या क्रमांकाचीच होती. त्यामुळे त्यांचे या क्रमांकाशी एकप्रकारे भावनिक नाते होते.

मात्र काल अहमदाबादेत जो भीषण अपघात घडला तेव्हा देखील १२ जून म्हणजे १२/०६ ही तारीख होती आणि यावेळेस मात्र त्यांचा हा लकी नंबर त्यांच्यासाठी अनलकी ठरला. कारण, या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळेच या नंबरचा एक दुर्दैवी योगायोग बनल्याचे बोलले जात आहे.

पंजाब भाजपचे प्रमुख सुनील जाखड यांच्या मते, विजय रुपाणी ५ जून रोजी त्यांच्या पत्नीसह लंडनला जाणार होते, परंतु लुधियाना पश्चिम पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी हा दौरा १२ जूनपर्यंत पुढे ढकलला होता. आता जाखड यांनी दुःख व्यक्त केले आणि म्हटले 'हे खूप दुर्दैवी आहे. नशिबाने असा खेळ केला की ते फेऱ्यात अडकले. पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला निघालेले रूपाणी पोहोचलेच नाहीत.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT