Vishal Patil News : शिंदें-फडणवीसांच्या पाडावासाठी एकजूट दाखविलेल्या आघाडीला 'चॅलेंज' करून अपक्ष विशाल पाटील खासदार झाले. खासदार झाल्या झाल्या त्यांनी काँग्रेसला पाठींबा दिला. फक्त पाठींबा देवूनच ते थांबले नाही तर पहिल्याच अधिवेशनावेळी संसदेबाहेर त्यांचा काँग्रेसच्या आंदोलनात झाले. दिल्लीतही त्यांचा आवाज घुमला.
काँग्रेसने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेत असताना संसदेच्या आवारात आंदोलन केले. त्यावेळी अपक्ष विशाल पाटील या आंदोलनात सहभागी होत घोषणा देत होते.
पांढरा कुर्ता आणि पायजमा घातलेले विशाल पाटील Vishal Patil सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खासदारांसोबत देखील त्यांनी संसदेबाहेर घोषणाबाजी केली. संसदेच्या पायऱ्यांवर देखील विशाल पाटील हे वर्षा गायकवाड, संजय दिना पाटील, शोभा बच्छाव यांच्यासोबत घोषणा देत होते.
काँग्रेसला Congress लोकसभेत 99 जागा मिळाल्या आहेत. तर, अपक्ष विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठींबा दिल्याने काँग्रेसची सेंच्युरी पूर्ण झाली आहे. विशाल पाटील यांनी निवडणूक जिंकल्यानंतर दिल्लीत जावून सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेत काँग्रेसला पाठींबा जाहीर केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.