Pramod Sawant | Vishwajeet Rane  Sarkarnama
देश

गोव्याच्या सत्तास्पर्धेत मोठा ट्विस्ट : सावंताच्या CM पदाच्या मार्गात राणेंचा खोडा?

Goa Assembly Election | Pramod Sawant | Vishwajeet Rane | सावंतांचा पत्ता कट?

सरकारनामा ब्युरो

पणजी : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब. ५ राज्यांच्या हाती आलेल्या निकालांमध्ये भाजप आणि आम आदमी पक्षाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. ५ पैकी उत्तराखंड, उत्तरप्रदेश, गोवा आणि मणिपूर या ४ राज्यांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मोठा विजय संपादन केला आहे. मात्र भाजपच्या मागील टेन्शन अजूनही संपताना दिसतं नाही. त्याचे कारण म्हणजे गोव्याच्या सत्ता स्पर्धेत आलेला मोठा ट्विस्ट.

गोव्यात भाजप नेते आणि आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांची नाराजी पुढे आली असून त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोद सावंत यांना थेट पाठिंबा देण्याविषयीच्या प्रश्वावर बोलणं टाळलं आहे. राणे यांना गोव्याचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, हा संवेदनशील प्रश्न आहे. त्यामुळे मी आत्ता काहीही बोलणार नाही, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान यापूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री पदावर असताना पर्रिकर यांचे निधन झाले. त्यावेळी राणेंचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये चर्चेत होते. मात्र, त्यावेळी राणे यांना थांबवून प्रमोद सावंत यांना संधी देण्यात आली होती. त्यानंतरच्या काळात सरकारचा गाडा हाकताना दोघांमधील मतभेद सातत्याने बाहेर येत होते. गोव्यात आता भाजपला अन्य अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजप बहुमत सिद्ध करून सत्तास्थापनेचा दावा करणार हे स्पष्ट आहे, मात्र त्यापूर्वी भाजपला अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागू शकतो.

मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर देणं टाळलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना फडणविस म्हणाले, निकालानंतर भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होतं असते. त्यानंतर निरीक्षक राज्यांमध्ये जावून विजयी आमदारांशी आणि जेष्ठ्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत असतात. त्यानंतर नाव घोषित होत असते. गोव्यात देखील हिच प्रक्रिया पूर्ण होईल, त्यानंतरच मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT