Pramod Sawant- Vishwajit Rane  Sarkarnama
देश

गोवा भाजपचे मतभेद चव्हाट्यावर; राणेंच्या जाहिरातीतून प्रमोद सावंत गायब

Goa| Politics| BJP| विश्वजीत राणे यांनी अचानक स्वतंत्रपणे गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांची राजभवनात भेट घेतली.

सरकारनामा ब्युरो

पणजी : विधानसभा निवडणूकीत भरगोस मतांनी विजय मिळवत भाजपने गोव्यात (Goa) आपली सत्ता कायम राखली. 40 पैकी 20 जागांवर मिळवत भाजपने (BJP) विजय मिळवला. अपक्ष उमेदवारांनी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचेही गोव्याचे निवडूक प्रभारी म्हणून किती कौतुक झाले. मात्र या विजयाच्या आनंदापेक्षा गोव्याच्या राजकीय वर्तुळातील मतभेद चव्हाच्यावर आले आहे.

गोव्याचे नवनिर्वाचित आमदार विश्वजित राणे (Vishwajit rane) यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना विरोध केला आहे. पक्षातूनच त्यांना विरोध होत असून त्यांना चक्क उघड-उघड आव्हान देण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. निवडणुकीपूर्वी भाजप विरुद्ध विरोधक असा सामना रंगला होता. मात्र निवडणूकीनंतर हे चित्र पालटले असून आता भाजप विरुद्ध भाजप असाच सामना रंगल्याचे दिसत आहे.

गोव्यातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार विश्वजीत राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना नेता मानण्यास नकार दिला आहे. निवडणूकांच्या निकालानंतर दोन दिवसांपूर्वी विश्वजीत राणे यांनी अचानक स्वतंत्रपणे गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांची राजभवनात भेट घेतली. विश्वजित राणे यांच्या राज्यपालांच्या स्वतंत्र भेटीमुळे गोव्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली होती. मात्र, आपण आपल्या मतदार संघातील कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रण द्यायला गेलो असल्याचा खुलासा विश्वजित राणे यांनी केला. याशिवाय भाजपच्या केंद्रीय स्तरावरून गोव्यातील नेत्यांना सत्तास्थापनेसाठी कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत. तसेच सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा पाठिंबा घेण्याबाबतही भाजपामध्ये मतभेद असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, गोव्याच्या निकालानंतर राणे कुटुंबीयांनी स्थानिक वृत्तपत्रात सलग दोन दिवस दिलेल्या जाहिरातीतून डॉ. प्रमोद सावंत यांचा फोटो गायब झाला. त्यामुळे गोवा भाजपमध्ये काहीच आलबेल नसल्याच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. निवडणूकीतील यशासाठी वाळपाई विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे धन्यवाद मानण्यासाठी विश्वजित राणे यांनी आजच्या स्थानिक आघाडीच्या वृत्तपत्रांत पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही भाजप नेत्यांची छायाचित्रे आहेत. मात्र, यातून फक्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा फोटो गायब आहे. विशेष म्हणजे विश्वजित राणे यांची पत्नी डॉ. दिव्या राणे यांनीही काल दिलेल्या जाहिरातीतही डॉ. प्रमोद सावंत यांचे छायाचित्र गायब होते. त्यामुळे आता गोव्यात मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT