Vladimir Putin News | Russia Ukraine War News Updates, Nikolai Petrushev News,
Vladimir Putin News | Russia Ukraine War News Updates, Nikolai Petrushev News,  Sarkarnama
देश

व्लादिमीर पुतीन तात्पुरता पदभार सोडणार; निकोलाय पॅत्रुशेव्ह यांच्याकडे रशियाची धुरा

सरकारनामा ब्युरो

मॉस्को : रशियाचे (Russia) राष्ट्राध्याक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) हे तात्पुरता पदभार सोडणार असल्याची माहिती मिळत आहे. पुतीन यांना काही दिवसांपासून कर्करोगाने (Cancer) ग्रासले असून त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे. या दरम्यान देशाची धुरा ‘द फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’चे (एफएसबी) माजी प्रमुख निकोलाय पॅत्रुशेव्ह (Nikolai patrushev) हे सांभाळणार आहेत. तसेच सध्या सुरु असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाची कमानही तात्पुरत्या स्वरुपात त्यांच्याकडेच राहणार आहे, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने ‘डेली मेल’ आणि न्युयॉर्क पोस्टने दिली आहे.

पुतीन यांच्यावरील कर्करोगाच्या शस्त्रक्रियेचा दावा टेलिग्राम वाहिनी ‘जनरल एसव्हीआर’ने केला आहे. ही माहिती ज्यांच्याकडून मिळाले, ती क्रेमलिनमधील उच्चपदस्थ व्यक्ती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या शस्त्रक्रियेनंतर पुतीन पुन्हा कधी सक्रिय होतील हे मी नेमके सांगणार नाही. पण खूप कमी कालावधीत ते पुन्हा कार्यरत होतील,’’ असेही या सूत्राने सांगितल्याीचे ‘डेली मेल’ने म्हटले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत ही शस्त्रक्रिया होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

कोण आहेत निकोलाय पॅत्रुशेव्ह?

निकोलाय पॅत्रुशेव्ह हे द फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’चे (एफएसबी) माजी प्रमुख असून पुतीन यांचे अत्यंत विश्‍वासू मानले जातात. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनवरील हल्ल्याच्या रणनीतीचे प्रमुख शिल्पकार मानले जातात. किव्हमध्ये नव-नाझीवाद्यांचे प्राबल्य वाढत असून ते रशियाच्याविरुद्ध सतत षड्‍यंत्र रचत असल्याचे निकोलाय पॅत्रुशेव्ह यांनीच पुतीन यांना पटवून दिले असल्याचे सांगितले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT