Karnataka election 2023  Sarkarnama
देश

Karnataka Elections : कर्नाटकात बुधवारी 'रणसंग्राम'; 5.31 कोटी मतदार ठरवणार सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात

Karnataka Elections News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही तास उरले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Assembly Elections News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही तास उरले आहेत. सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती हे बुधवारी ठरणार आहे. 10 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकातील 5 कोटी 31 लाख मतदार मतदान करणार आहेत.

राज्यातील 2 हजार 615 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. कर्नाटकातील (Karnataka) विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यभरातील एकूण 58 हजार 545 मतदान केंद्रांवर मतदान करण्याची सुविधा करण्यात आली आहे. मतदानादरम्यान एकूण 75 हजार 603 बॅलेट युनिट, 70 हजार 300 कंट्रोल युनिट आणि 76 हजार 202 व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल वापरण्यात येणार आहे.

राज्यभरातील एकूण 5,31,33,054 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांमध्ये 2,67,28,053 पुरुष तर 2,64,00,074 महिला मतदार आहेत. राज्यात 11,71,558 तरुण मतदार आहेत, तर 5,71,281 शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत. 12 लाख 15 हजार 920 मतदार हे 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2 हजार 615 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामध्ये 2 हजार 430 पुरुष तर 184 महिला उमेदवार आहेत. तर एका तृतीयपंथीय उमेदवाराचाही समावेश आहे. सर्व उमेदवारांचे भवितव्य बुधवारी मतदान पेटीत बंद होणार आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी महिनाभर जोरदार प्रचार केला आहे.

राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार हे उद्या ठरणार आहे. भाजप (BJP) सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस (Congress) सत्तेत येणार हे बुधवारी ठरणार आहे. बुधवारी मतदान होऊन १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटमध्ये पाच वर्षांनी राज्यात सत्ताबदल होतो. हा समज मोडून काढण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यात प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे काँग्रेसच्या राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सिद्धरमय्या व डी. के. शिवकुमार या नेत्यांनी तोडीस तोड काम करत प्रचाराचा धडाका लावला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT