Nabam Rebia Case Hearing  Sarkarnama
देश

Nabam Rebia Case : ठाकरे गटाच्या पदरी प्रतीक्षाच; 'नबाम रेबिया'प्रकरणी सुनावणी थेट पुढच्या वर्षी!

Nabam Rebia Case Hearing : "शिवसेना आणि पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत जे घडले, त्या पार्श्वभूमीवर..."

Chetan Zadpe

Maharashtra Politics Case : नबाम रेबिया प्रकरणाच्या अनुषंगाने शिवसेना पक्षावरील सुनावणी व्हावी, अशी ठाकरे गटाची आग्रही मागणी होती. मात्र, नबाम रेबिया प्रकरणाची सुनावणी आता थेट पुढच्या वर्षी होणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाला आणखी प्रतीक्षाच करावी लागणार अशी चिन्हे आहेत. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात सर्वात कळीचा मुद्दा ठरलेल्या नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दिले होते. यावरील सुनावणीही लवकर पार पडेल अशी अपेक्षा होती. मात्र, आता ही सुनावणी थेट पुढच्याच वर्षी ७ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी कधी आणि कशी होणार आहे, त्याची रूपरेषा न्यायालय स्पष्ट करणार होते. मात्र, ही सुनावणी आणखीनच लांबणीवर पडली आहे.

केवळ एका अविश्वास प्रस्तावाच्या नोटिशीने विधानसभा अध्यक्षांचे अपात्रतेबाबतचे अधिकार बाध्य होतात की नाहीत, याचा फैसला नव्याने होणार आहे. शिवसेना आणि पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत जे घडले, त्या पार्श्वभूमीवर देशाच्या भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असणार आहे.

शिंदे गटाने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narahari Zirawal) यांच्यावर अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती. त्यामुळे त्यांना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेता आला नव्हता.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT