Congress Politics : वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका गांधी यांच्या प्रचारासाठी त्यांचे बंधू व पक्षाचे नेते राहुल गांधी मैदानात उतरले आहे. दोन दिवस ते मतदारसंघात बहिणीचा प्रचार करणार आहेत. पण प्रचाराला सुरुवात होण्याआधीपासूनच प्रियांका यांनी मतदारसंघाच्या विकासासाठीच्या कामांनाही सुरूवात केली आहे.
राहुल गांधींनीच ही बाब समोर आणली आहे. त्यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये ते प्रियांका गांधी यांनी मतदारसंघासाठी आपले काम सुरु केल्याचे सांगत आहेत. वायनाडला प्रियांकाच्या रुपाने त्यांचा सर्वोत्तम खासदार मिळेल, असा विश्वास राहुल यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केला आहे.
प्रियांकाने आधीपासूनच आपले प्राधान्यक्रम निश्चित करून येथील विविध अडचणींवर मात करण्याचे नियोजन आणि मतदारसंघाच्या विकासाला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ती एक लोकप्रतिनिधीपेक्षा तुमची बहीण, मुलगी असेल, असेही राहुल यांनी म्हटले आहे.
आम्ही जेव्हा इथे आलो, त्यावेळी तिच्याकडे यादी तयार होती. भविष्यात आपण कशाला प्राधान्य देऊ शकतो, वायनाडच्या मुद्द्यांसाठी आपल्याला कुणाशी संघर्ष करावा लागेल, वायनाडला आपण कसे सक्षम बनवू शकू, असे अनेक मुद्दे तिच्या यादीत आहे. तुमच्यासाठी काय करता येईल, याचे काम तिने सुरूही केल्याचे राहुल यांनी सांगितले.
दरम्यान, प्रियांका गांधी यांची ही पहिलीच निवडणूक आहे. राहुल गांधी यांनी वायनाडचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. त्यांनी रायबरेलीतील लोकसभा सदस्यत्व कायम ठेवले आहे. वायनाड मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यमुळे प्रियांका यांचा विजय सोपा असल्याचे मानले जात आहे. भाजपनेही या मतदारसंघात फारसा जोर लावल्याचे दिसत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.