Abhishek Banerjee and Mamata Banerjee  Sarkarnama
देश

West Bengal: भष्ट्राचारी नेत्यांचे दाबे दणाणले ; TMC चा मोठा निर्णय

West Bengal News : हीच नवीन तृणमूल काँग्रेस असेल," असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले.

सरकारनामा ब्युरो

West Bengal News : भष्ट्राचारी नेत्यांमुळे पक्षाची प्रतिमा खराब होते, यासाठी तृणमूल काँग्रेसने (TMC) मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत टीएमसीच्या २६ व्या स्थापना दिनानिमित्त पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी ही घोषणा केली आहे. यामुळे अनेक भष्ट्राचारी नेत्याचे दाबे दणाणले आहे.

भष्ट्राचाराचा आरोप सिद्ध झाल्यास अशा नेत्यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार आहे, असे अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले. टीएमटीच्या नवीन भवनाचे भूमिपूजन रविवारी झाले. त्यावेळी बॅनर्जी बोलत होते.

"नव्या तृणमूल काँग्रेसच्या उभारणीबाबत मी गेल्या वर्षी एका रॅलीमध्ये सांगितले होते की, भष्ट्राचाराचा आरोप सिद्ध झाल्यानंतर संबधीत नेत्याला घरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे, हीच नवीन तृणमूल काँग्रेस असेल," असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले.

टीएमसीच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी म्हणाले, "भष्ट्राचारासाठी काही जण पक्षाचा उपयोग करीत असतात. त्यांना रोखण्यासाठी हे करण्यात येत आहे. पक्षाचा राजकीय संकल्पापेक्षा सामाजिक संकल्प हा महत्वाचा आहे. एका इनामदार, प्रामणिक नेता हा जनतेच्या मागण्याकडे लक्ष देऊन त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो,"

"ममता बॅनर्जी यांचा अपमान करणे हा विरोधीपक्षाचा डाव आहे. राज्याला बदनामा करण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहे, याचा उत्तर येत्या निवडणूक देण्यात येईल," असे बॅनर्जी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT