Mamata Banerjee
Mamata Banerjee Sarkarnama
देश

'खेला होबे'...; ममता बॅनर्जी कडाडल्या; भाजपच्या पराभवाची सुरुवात बंगालमधूनच होईल...

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : देश पातळीवर विरोधी पक्षांना एकत्र करण्याची मोहीम सुरु आहे. त्यातच पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपच्या (BJP) पराभवाची सुरुवात बंगालमधूनच होणार असल्याचे म्हटले आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत, असे त्यांनी सांगितले आहे. आता अखिलेश यादव, नितीशकुमार, हेमंत सोरेन हे सगळे एकत्र आले आहेत. ज्यांना 300 जागांचा अभिमान आहे, त्यांनी लक्षात ठेवावे की राजीव गांधी यांच्याकडे 400 जागा होत्या, इशारा बॅनर्जी यांनी भाजपला दिला आहे.

जे 300 बद्दल बोलत आहेत त्यांना 5 राज्यांमध्ये 100 जागांचा झटका बसणार आहे. बॅनर्जी म्हणाल्या की, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा वापर करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल, असेही बॅनर्जी यांनी सांगितले. दरम्यान, 2021 च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने सलग तिसरा विजय मिळवला आणि सरकार स्थापन केले. 2024 मध्ये भाजपला सत्तेवरून हटवण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही दिल्लीमध्ये सर्व पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाडी सुरु केल्या आहेत. हीच प्रमुख आघाडी असेल, असे त्यांनी सांगितले आहे.

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी विरोधकांना एकत्र करण्याच्या मिशनचा एक भाग म्हणून नितीश कुमार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. नितीश कुमार यांनी गेल्या महिन्यात भाजपशी संबंध तोडल्यानंतर सोमवारी दिल्ली गाठली. यादरम्यान त्यांनी विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची भेटी घेतल्या.

नितीश कुमार यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, जेडीयूचे एचडी कुमारस्वामी, सीपीआय(एम) सरचिटणीस सीताराम येचुरी, सीपीआयचे डी राजा, इंडियन नॅशनल लोक दलाचे ओमप्रकाश चौटाला आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचीही भेट घेतली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या वतीने कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात करण्यात आली. या यात्रेचे नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. काँग्रेस नेते 3500 किलोमीटरची पदयात्रा काढून भाजप सरकारविरोधात देशभरात आंदोलन करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT