Mamata Banerjee
Mamata Banerjee Sarkarnama
देश

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींच्या डोक्याला गंभीर दुखापत; रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात दाखल!

Mayur Ratnaparkhe

Mamata Banerjee has been Seriously Injured : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, रक्तस्त्राव झाला आहे. तृणमूल काँग्रेसकडून ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली गेली आहे. सध्या ममता बॅनर्जींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केलं आहे.

एसएसकेएम रुग्णालायच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) कोलकातामधील बालीगंज जिल्ह्यातील एका कार्यक्रमांवरून येत असताना, पडल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी त्यांना तत्काळ एसएसकेएम रुग्णालयात घेऊन गेले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ममता बॅनर्जींना दुखापत झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांवर येताच, एकच खळबळ उडाली. त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असलेला, फोटो व्हायरल झाला असून, यामुळे त्यांना झालेली दुखापत गंभीर असल्याचे स्पष्ट होते. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर रुग्णालय परिसरात तृणमूल काँग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

ममता बॅनर्जी नेमक्या कशामुळे पडल्या याबाबत अधिकृतपणे माहिती समोर आलेली नाही. मात्र त्या घरात असतानाच पडल्या असून, त्यांना घरातील फर्निचर लागल्याची माहिती समोर आली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT