BJP first candidate list West Bengal election 2026 Sarkarnama
देश

West Bengal Election 2026 : ममता दीदींना टफ फाईट : भाजपच्या पहिल्या यादीत 23 शिक्षक, 5 डॉक्टर, 6 वकिलांना उमेदवारी

West Bengal election BJP candidate list 2026: भाजपने जाहीर केलेल्या यादीत 41 विद्यमान आमदार आहेत. तर तीन माजी आमदारांना पुन्हा संधी दिली आहे.

Mangesh Mahale

BJP released its first candidate list for West Bengal Election 2026: भारतीय जनता पार्टी ने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. भाजपनं पहिल्या यादीत 144 उमेदवारांची नावांचा समावेश केला आहे.

144 उमेदवारांपैकी 57 उमेदवार हे व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील आहेत. यात 23 शिक्षक, 8 सामाजिक कार्यकर्ते, 5,डॉक्टर, 6 वकिलांना उमेदवारी दिली आहे.

भाजपने विरोधी पक्षनेता शुभेंदू अधिकारी यांना नंदीग्राम आणि भवानीपुर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून ममता बॅनर्जी पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या. आता या ठिकाणी सुवेंदु अधिकारी विरुद्ध ममतादीदी असा सामना रंगणार आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम येथून शुभेंदू अधिकारी यांच्या विरोधात निवडणुक लढण्याची निर्णय घेतला होता, पण त्यांचा येथे पराभव झाला होता. त्यानंतर भवानीनगर विधानसभेचे टीएमसी आमदार सोवनदेब चट्टोपाध्याय यांनी राजीनामा देत ही जागा ममतादीदींना दिली होती. भवानीनगर पोटनिवडूक जिंकल्यानंतर ममतादीदी या मुख्यमंत्री झाल्या होत्या. यावेळी त्यांना शह देण्यासाठी भाजपने मोठी रणनीती आखली आहे. शुभेंदू अधिकारी यांच्यासारखा तगडा उमेदवार भाजपने याठिकाणी दिला आहे.

भाजपने जाहीर केलेल्या यादीत 41 विद्यमान आमदार आहेत. तर तीन माजी आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. भाजपचे माजी प्रदेशअध्यक्ष दिलीप घोष यांना खडगपूर सदर येथून निवडणूक लढणार आहेत. भाजपने आपली आक्रमक नेत्या अग्निमित्रा पॉल यांना आसनसोल दक्षिण येथून उमेदवारी दिली आहे.

माजी राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता राशबेहारी मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे लेखक बंकिम चंद्र चट्टोपाध्याय यांच्या परिवारातील सौमित्र चट्टोपाध्याय यांना नैहाटी येथून उमेदवारी दिली आहे.

रविवारी केंद्रीय निवडणुक आयोगाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होईल. तर, दुसऱ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान होणार आहे. मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. गेल्या निवडणुकीत टीएमसीनं 215 तर भाजपनं 77 जागांवर विजय मिळवला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT