टीएमसी पश्चिम बंगालमध्ये पिछाडीवर दिसत असताना ममता बॅनर्जींनी महत्त्वाचा संदेश दिला आहे. त्या म्हणाल्या शेवटच्या फेरीपर्यंत आम्हीच जिंकणार आहोत. कार्यकर्त्यांनी निकालाचे ठिकाण सोडून जाऊ नये. शेवटी टीएमसीच जिंकेल
पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री म्हणू सुवेंदू अधिकारी यांचे नाव आघाडीवर आहे.
भाजप तब्बल 180 जागांच्या पार जाताना दिसून येत आहे. तर, टीएमसी 100 जागांवर दिसत आहे. दोन्ही पक्षातील मतांचे अंतर तीन टक्के आहे.
भाजपने पश्चिम बंगालमध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. जे कल दिसून येत आहेत. त्यामध्ये 147 जागा बहुमतासाठी आवश्यक असताना भाजपने 159 जागांवर आघाडी घेतली आहे. तर, टीएमसी 122 जागांवर आघाडीवर आहे.
भवानीपूरमधून ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणूक लढणार सुवेंदू अधिकारी हे पिछाडीवर आहेत. मात्र, ममता आणि त्यांच्यातील मतांचे अंतर अवघे 1500 आहे.
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी 124 जागांवर तर, भाजप 137 जागांवर आघाडीवर आहे. बहुतासाठी 147 जागांची आवश्यकता होती.
पश्चिम बंगालमध्ये भाजप बहुमताच्या जवळ दिसून येत आहे. अवघ्या 12 जागा भाजप बहुमतापासून दूर असून हे सुरुवातीचे कल आहेत. टीएमसी 100 जागांच्या जवळ आघाडीवर दिसत आहे.
पश्चिम बंगालमध्ये 200 जागांचे कल समोर येत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये 93-93 जागांवर भाजप आणि टीएमसी आघाडीवर आहे. दोन्ही पक्षांमध्ये काटे की टक्कर दिसून येत आहे.
भवानीपूर विधानसभा मतदासंघातून ममता बॅनर्जी पिछाडीवर असल्याचे वृत्त आहे. मात्र, तब्बल मतमोजणीचे तब्बल 20 राऊंड असल्याने ही पिछाडी कायम राहते की वाढते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. दरम्यान, पुढील राऊंडमध्ये ममता बॅनर्जी आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे मुख्य दावेदार सुवेंद्र अधिकारी हे भवानीपूरमधून निवडणूक लढले. सुरुवातीच्या कलांमध्ये ते आघाडीवर आहेत. तर, टीएमसीचा उमेदवार पिछाडीवर आहे.
सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आणि टीएमसीमध्ये काटे की टक्कर दिसून येत आहे. तृणमूल काँग्रेस 58 तर, भाजप 60 जागांवर आघाडी असल्याचे दिसून येत आहे. पोस्टल मतदानाची ही मोजणी सुरू आहे. अगदी सुरुवातीचे हे कल असल्याने काहीही होऊ शकते असा अंदाज आहे.
सुरुवातीचे कल समोर येत असून तीन जागांवर भाजप पुढे असल्याचे दिसून येत आहे. तर, टीएमसी एक जागेवर पुढे आहे. पोस्टल मतदानामध्ये भाजप पुढे दिसत आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून ममता बॅनर्जींच्या टीएमसी विरुद्ध भाजप अशी मुख्य लढत असलेल्या या निवडणुकीत विधानसभेच्या 293 जागा असून 147 ला बहुत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.