Locket Chatterjee
Locket Chatterjee sarkarnama
देश

Draupadi Murmu : राष्ट्रपतींचा अपमान करणाऱ्या तृणमूलच्या मंत्र्यांविरोधात भाजपनं उचललं मोठं पाऊल

सरकारनामा ब्युरो

Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री,तृणमूल काँग्रेसचे नेते अखिल गिरी यांनी नुकतेच वादग्रस्त विधान केले आहे. गिरी यांच्या या विधानानंतर भाजपा आता आक्रमक झाला आहे. (Akhil Giri insulting President Draupadi Murmu latest news)

गिरी यांच्या विरोधात भाजपा खासदार आणि पश्चिम बंगालच्या भाजप महासचिव लॉकेट चटर्जी (Locket Chatterjee) यांनी आता पोलीस ठाणे गाठले आहे. गिरी यांच्याविरोधात त्यांनी नॉर्थ एवेन्यू पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर लॉकेट चटर्जी म्हणाल्या,"अखिल गिरी यांनी द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत यापूर्वी २७ आँक्टोंबर रोजी अपमानकारक विधान केले होते. त्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपतींच्या विरोधात वादग्रस्त विधान केलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्वतः महिला असून त्यांनी याबाबत अद्यापपर्यंत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही,"

"ही घटना जर उत्तरप्रदेशात झाली असती तर ममता बनर्जी आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आंदोलन केले असते. ममता बनर्जी यांनी याबाबतचे मौन सोडलं पाहिजे. त्यांनी गिरी यांचा राजीनामा घेतला पाहिजे, " असे लॉकेट चटर्जी म्हणाल्या.

अखिल गिरी यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे. भाजपने ममता बॅनर्जींकडे त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली. त्यांच्या या विधानाची केंद्रीय महिला आयोगाने दखल घेऊन त्यांना जाहीर लेखी माफी मागण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून अखिल गिरी यांची चौकशी आणि तपास करून त्याचा रिपोर्ट सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.

काय म्हणाले होते अखिल गिरी...

शहीद दिवसानिमित्त नंदिग्राम मध्ये एका सभेत बोलताना अखिल गिरी यांनी सुरुवातीला विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्यावर टीकास्त्र सोडले. शुभेंदू अधिकारी हे मला मी चांगला दिसत नसल्याचे बोलतात. पण राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर बसलेल्या बद्दल आपल्याला आदर आहे. पण तुम्हीच पाहा आपल्या राष्ट्रपती कशा दिसतात ते! त्या राष्ट्रपती शोभतात का ?, अशी अपमानास्पद टिप्पणी अखिल गिरी यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT