TMC 20 rebel MPs Sarkarnama
देश

TMC rebel MPs : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा राजकीय भूकंप; सायोनी घोष यांचा समावेश असलेल्या 20 बंडखोर खासदारांमध्ये फूट, तिघांचा भाजप प्रवेशास नकार

TMC split, TMC 20 rebel MPs, Saayoni Ghosh, Yusuf Pathan : एनसीपीआयमध्ये विलीन झालेल्या बंडखोर खासदारांमध्ये पुन्हा फूट; दुर्गापूजेआधी १७ खासदारांचा भाजपकडे मोर्चा, मुस्लिम मतदारसंघांमुळे तीन खासदार सावध भूमिकेत.

Rajanand More

West Bengal politics : पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसच्या २० बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गट करत नॅशनलिस्ट सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन होण्याच्या निर्णय घेतला होता. पण आता त्यापैकी १७ खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट त्यापैकीच एका खासदाराने केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

बंडखोर खासदार जगदीश चंद्र बर्मा बसुनिया यांनी हा धक्कादायक दावा केला आहे. दुर्गा पुजेआधी NCPI चे १७ खासदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असे ते म्हणाले आहे. मात्र, तीन मुस्लिम खासदारांचा पक्षप्रवेश होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. हे तिन्ही खासदार बाहेरून एनडीएला पाठिंबा देतील, असे बर्मा म्हणाले आहेत.

एनसीपीच्या १७ खासदारांनी एकत्रितपणे भाजपमध्ये प्रवेश करण्याचे ठरविले आहे. दोन तृतियांशहून अधिक खासदार पक्षांतर करत असलेल्या पक्षांतरबंदी कायदा लागू होणार नाही. तर अबू ताहेर खान, खलीलुर रहमान आणि यूसुफ पठाण हे तीन खासदार थेट भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत. त्यांच्या मतदारसंघात मुस्लिम बहुल भाग मोठा आहे. त्यामुळे त्यांना अडचणीचे होऊ सकते. मात्र, त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी टाकली जाऊ शकते, असेही बर्मा यांनी स्पष्ट केले.

तोपर्यंत दरवाजे बंद

दरम्यान, टीएमसीच्या २० खासदारांनी १४ जूनला एनसीपीआयमध्ये विलीन होण्याचा निर्णयघेतला होता. तसेच एनडीएलाही पाठिंबा जाहीर केला होता. आता ते पुन्हा भाजपमध्ये विलीन होण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, अद्याप लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एनसीपीआयमधील त्यांच्या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब केलेले नाही. त्यावर निर्णय होईपर्यंत या खासदारांना भाजपचे दरवाजे बंदच असतील.

मतदारसंघात विरोध

बसुनिया हे मतदारसंघात परतल्यानंतर स्थानिकांसह भाजप समर्थकांनी त्यांचा कडाडून विरोध केला होता. मागील १५ वर्षांत त्यांनी भ्रष्टाचारातून मोठी संपत्ती जमविल्याचा आरोप होत आहे. बसुनिया यांच्या भाजप प्रवेशालाही विरोध होत आहे. ते आधी फॉरवर्ड ब्लॉकमध्ये होते. नंतर तृणमूल काँग्रेस अन् आता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे आंदोलकांनी म्हटले होते. त्यानंतर काही दिवसांतच बसुनिया यांनी भाजप प्रवेशाचा प्लॅन सांगितला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT