Rajasthan - Gulabchand Katariya
Rajasthan - Gulabchand Katariya Sarkarnama
देश

राजस्थानमधील विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया सभागृहात जेव्हा रडू लागतात...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : परीक्षांमधील कॉपी प्रकरणाला प्रतिबंध करण्यासाठी आणलेल्या विधेयकावर बोलताना राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया (Gulabchand Katariya) यांना रडू कोसळले. गेल्या दहा वर्षातील विविध परीक्षांच्या निकालाची चौकशी करा. त्यातून सत्य बाहेर येईल, असे सांगताना पैसे देऊन पेपर फोडणाऱ्यांना शिक्षा झाली तरच गरीबांच्या मुलांना न्याय मिळेल, असे त्यांनी सांगितले.

राजस्थानमधील परीक्षा मंडळ तसेच विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी तसेच सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांची क्लास चालकांकडून फसवणूक होते. क्लास चालवणारे कोट्यवधी रूपये देऊन परीक्षेचे पेपर फोडतात. तेच पेपर आपल्या क्लासमधील मुलांना वाटतात. त्यातून उत्तीर्ण होणाऱ्या मुलांची देशभर जाहिरात करून पुन्हा नव्या मुलांना प्रवेश देऊन कराडो रूपये कमावतात. हा मोठा धंदा झाला असून यामागे मोठे रॅकेट असल्याचा आरोप करीत, याचा शोध घेण्याची आणि गरीबांना न्याय देण्याची मागणी करताना कटारिया यांना रडू कोसळले.

परीक्षेत होणारे गैरप्रकार त्यातून पैसेवाल्या मुलांना मिळणारा फायदा व गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे होणारे नुकसान सांगताना कटारिया यांना हुंदके आवरत नव्हते.सरकारने केलेला कायदा पेपर फोडणाऱ्या किंवा कॉपी करणाऱ्या माफियांसाठी पुरेसा नाही, असा त्यांच्या भाषणाचा रोख होता.त्यांचे भाषण सुरू असताना संपूर्ण सभागृह स्तब्ध होते.

सरकार कोणत्या पक्षाचे आहे. यापेक्षा शिक्षणातील या माफियांमुळे गरीब मुलांना उच्च शिक्षण संस्थांमधील शिक्षणापासून वंचीत राहावे, लागत आहे. याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी केवळ कायदा करून चालणार नाही तर आणखी कडक उपाययोजना करून ही प्रवृत्ती मुळातून काढायला हवी, असे मत कटारिया यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT