New Delhi : मोदी सरकारकडून संसदेत दोन दिवस यूपीए सरकारच्या काळात झालेले घोटाळे आणि आर्थिक बेशिस्तीवर प्रहार केला जाणार आहे. व्हाईट पेपरच्या माध्यमातून मागील सरकारच्या कामगिरीची झाडाझडती घेतली जाणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आदर्श घोटाळा, टू जी, कॉमनवेल्थ, हेलिकॉप्टर खरेदी अशा प्रमुख 15 घोटाळ्यांचा समावेश आहे. (White Paper News)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी गुरूवारी लोकसभेत (Lok Sabha) व्हाईट पेपर सादर केला. त्यावर आज लोकसभेत आणि उद्या राज्यसभेत (Rajya Sabha) चर्चा घडवून आणली जाणार आहे. मोदी सरकारकडून (Modi Government) यूपीए सरकारच्या (UPA Government) कामगिरीची चिरफाड केली जाणार असल्याने आज लोकसभेत सरकार आणि विरोधक असा थेट सामना होणार आहे. मोदी सरकारकडून मागील दहा वर्षांच्या कामगिरीवरही प्रकाशझोत टाकला जाणार आहे. दोन्ही सरकारची तुलना यातून केली जाणार आहे.
‘व्हाईट पेपर’मध्ये या 15 घोटाळ्यांचा उल्लेख -
कोळसा घोटाळा – कोळसा ब्लॉक अलोकेशनमध्ये हा घोटाळा झाला होता. यामध्ये सरकारचा तब्बल 1.86 लाख कोटीचा तोटा झाल्याचा आरोप झाला होता. सुप्रीम कोर्टाने 204 अलोकेशन्स रद्द केले होते.
2010 कॉमनवेल्थ गेम्स – पुण्याचे तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी या घोटाळ्यात जवळपास नऊ महिने तुरूंगात होते. भ्रष्टाचार, व्यवस्थापनाचा अभाव, नियोजनात आर्थिक अनियमितता झाल्याचे व्हाईट पेपरमध्ये नमूद करण्यात आले आहे.
2 जी स्कॅम – कॅग रिपोर्टनुसार सरकारचे 1.76 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. तत्कालीन दूरसंचार मंत्री डी. राजा यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी काही महिने तुरूंगात होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
4. शारदा चिट फंड – हा घोटाळा 2013 मध्ये समोर आला होता. प्रामुख्याने तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप झाले होते. गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचा वापर वैयक्तिक कारणांसाठी झाला.
5. आयएनएक्स मीडिया – मीडिया कंपनीत गुंतवणुकीसाठी परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्यात अनियमितता आणि मनी लाँर्डिंग. सीबीआयकडून खासदार कार्ती चिदंबरम यांची चौकशी सुरू आहे. त्यावेली पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री होते.
6. एअरसेल मॅक्सिस – टेलिकॉम कंपनीमध्ये परकीय गुंतवणुकीला परवानगी देताना अनियमितता. चिदंबरम यांचा सहभाग असल्याचा आरोप.
7. अँट्रिक्स-देवास करार – अँट्रिक्स कॉर्पोरेशन आणि देवास मल्टिमीडिया यांच्यातील सॅटेलाईट करारात भ्रष्टाचार. सुप्रीम कोर्टाकडूनही शिक्कामोर्तब.
8. नोकरीसाठी जमीन – तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबावर नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याचा आरोप. सध्या चौकशी सुरू.
9. पंचकुला आण गुरुग्राममधील मोक्याच्या जागा – बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी मोक्याच्या जागा, व्यावसायिक जागा अलॉट करणे. काँग्रेसची सत्ता असलेल्या तत्कालीन हरयाणा सरकारवर आरोप.
10. जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशन – बोगस बँक खाती उघडताना 44 कोटींचा घोटाळा. ईडीने याप्रकरणी माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुला यांना आरोपी केले आहे.
11. एम्ब्राएर करार – एम्ब्राएर या ब्राझिलियन एरोस्पेस कंपनीकडून विमान खरेदीमध्ये भ्रष्टाचार. सीबीआयकडून आरोपपत्र दाखल.
12. पिलाटस बेसिक ट्रेनर एअरक्राफ्ट – 2009 मध्ये भारतीय हवाई दलासाठी 75 पिलाटस बेसिक ट्रेनर विमान खरेदीत भ्रष्टाचार. भाजप खासदार निशीकांत दुबे यांच्याकडून रॉबर्ट वाद्रा यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला होता.
13. हॉक एअरक्राफ्ट खरेदी – 2003 ते 2012 दरम्यान हॉक विमान खरेदीत घोटाळा. संरक्षण मंत्र्यालयातील अधिकाऱ्याने लाच घेतली. सीबीआयकडून तपास सुरू आहे.
14. आदर्श घोटाळा – मुंबईत संरक्षण मंत्रालयाच्या जागेवर बांधलेल्या आदर्श हाऊसिंग सोसायटीमध्ये काँग्रेस नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना फ्लॅट देण्यात आल्याचा आरोप. शहीद जवानांच्या विधवा पत्नींसाठी ही सोसायटी उभारण्यात आली होती. या घोटाळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचेही नाव होते. त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
15. ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा – व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीत घोटाळा. 12 ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीत घोटाळा. काँग्रेस नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांनी लाच घेतली. 2013 मध्ये झालेल्या घोटाळाप्रकरणी 2014 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.